ठळक मुद्देपण या दोघांना आयपीएलमध्ये खेळता येणार की नाही, याबाबत काही दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे.
सिडनी : चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. पण आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आहे. त्याचबरोबर हे काळे कृत्य करणाऱ्या कॅमेरुन बेनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालती आहे.
डेव्हिड वॉर्नरची आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. यापूर्वी स्टीव्हन स्मिथची राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. पण आयपीएलमध्ये खेळता येणार की नाही, याबाबत काही दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे.
काय आहे प्रकरण
केप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. पंच जवळ येत असतानाच बेनक्राफ्ट याने आपल्या अंतवस्त्रात एक छोटी पिवळी वस्तु लपवली. जेव्हा पंचांनी त्याला विचारले. तेव्हा पँटमध्ये हात टाकून त्याने ती वस्तु दाखवली. चष्मा साफ करण्याच्या मऊ कपड्यासारखी ती होती. बेनक्राफ्ट याने पत्रकार परिषदेत मान्य केले की तो टेपने चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांना आपले पद गमवावे लागले होते.
Web Title: Smith and Warner get one year ban
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.