सिडनी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड केली होती. या प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामन्याच्या उर्वरीत दोन दिवसांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी यष्टीरक्षक टीम पेनकडे सोपवण्यात आली आहे.
काय आहे प्रकरणकेप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड करणे हा तर रणनितीचाच असल्याचे मान्य केले आहे. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा डागाळली आहे.