ठळक मुद्देआई-बाबांनी आमची या प्रकरणामुळे शरमेने मान झुकली असल्याचे बोलून दाखवले. ही बोच स्मिथच्या मनाला लागली.
सिडनी : काही दिवसांपूर्वी क्रिकेट जगताचा तो नायक होता. काही जणांच्या गळ्यातील ताईत. बऱ्याच जणांचा आदर्श. सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत त्याचे नाव घेतले जात होते. पैसा, मान-सन्मान, प्रसिद्धी सारं काही आपसूकच त्याला मिळालं होतं. पण दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात एक वाईट गोष्ट घडली आणि क्रिकेट जगताचा खलनायक ठरला तो स्टीव्हन स्मिथ.
हा सारा प्रकार घडल्यावर स्मिथला मायदेशी बोलावून घेतले. यावेळी केप टाऊनच्या विमानतळावर जेव्हा स्मिथ सिडनीसाठी रवाना होण्यासाठी निघाला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या चाहत्यांनी त्याची हुर्यो उडवली. तू चीटर आहे, खेळाची तू फसवणूक केलीस, असं चाहते यावेळी बोलत होते. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांनीही स्मिथला गराडा घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी त्याला चारही बाजूने घेरले आणि विमानापर्यंत पोहोचवले. हे सारे पाहून ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू व्यथित झाले आहे. याप्रकरणी नाराजी व्यक्त करताना काही खेळाडूंनी म्हटले की, " स्मिथकडून चूक झाली आहे, त्याचे समर्थन कुणीही करणार नाही. पण त्याला एखाद्या कुख्यात गुन्हेगारासारखी वागणूक देता कामा नये. "
सिडनीला घरी आल्यावर त्याच्या कुटुंबियांनीही त्याला चांगलेच धारेवर धरले. त्याच्या आई-बाबांनी आमची या प्रकरणामुळे शरमेने मान झुकली असल्याचे बोलून दाखवले. ही बोच स्मिथच्या मनाला लागली. तो पूर्णपणे खचला. त्यानंतर आपल्या या कृत्यामुळे आपण काय गमावले आहे, याची जाणीव स्मिथला झाली. त्यामुळेच पत्रकार परिषदेमध्ये स्मिथ ढसा ढसा रडला आणि त्याने साऱ्यांचीच याप्रकरणी माफी मागितली.
Web Title: Smith burst into tears ... but why?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.