Join us  

असं करणारा स्मिथ कसोटी इतिहासातला पहिला फलंदाज

कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या 23 व्या कसोटी शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथा अ‍ॅशेस कसोटी सामना अनिर्णीत राखला.  स्मिथने इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना नाबाद 102 धावांची खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 6:31 PM

Open in App

मेलबोर्न - कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या 23 व्या कसोटी शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथा अ‍ॅशेस कसोटी सामना अनिर्णीत राखला.  स्मिथने इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना नाबाद 102 धावांची खेळी केली. स्मिथचे या मालिकेतील हे तिसरे शतक आहे.स्मिथ आता मेलबोर्नमध्ये सलग चार कसोटी शतक झळकाविणारा डॉन ब्रॅडनमनंतरचा एकमेव फलंदाज ठरला आहे. त्याने एका कॅलेंडर वर्षांत दोनदा सहा शतके झळकावण्याच्या रिकी पॉन्टिंगच्या विक्रमाची बरोबरी केली आहे

स्मिथने यावर्षी 76.76 च्या सरासरीने 1305 धावा केल्या. त्याच वेळी, कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील स्मिथ हा पहिला खेळाडू बनला आहे, ज्याने 70 च्या रनरेटने 4 वर्षात 1000 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.

कसोटीत स्टीव्ह स्मिथची कामगिरी

  • वर्ष 2014: 1146 धावा, 81.85 (सरासरी)
  • वर्ष 2015: 1474 धावा, 73.70 (सरासरी)
  • वर्ष 2016: 1097 धावा, 71.9 3 (सरासरी)
  • वर्ष 2017: 1305 धावा, 76.76 (सरासरी)

याशिवाय, कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा फलंदाजांच्या यादीत स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्यांच्या आधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकाचा ग्रॅम स्मिथ आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांच्या नावावर आहे.

कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी शतके

  • 25 ग्रॅम स्मिथ
  • 19 रिकी पाँटिंग
  • 15 अॅलन बॉर्डर / स्टीव्ह वॉ / स्टीव्ह स्मिथ 

 

दरम्यान, पाचवा व अखेरचा कसोटी सामना पुढील आठवड्यात सिडनीमध्ये खेळला जाणार आहे.  बॉक्सिंग डे कसोटीच्या २० वर्षांच्या इतिहासात अनिर्णीत संपलेला हा दुसराच सामना आहे. 

 

टॅग्स :क्रिकेटआॅस्ट्रेलियाइंग्लंडअॅशेस मालिका