दुबई : इंग्लंडविरुद्ध अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतके झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ मंगळवारी जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत भारताच्या चेतेश्वर पुजाराला पिछाडीवर सोडत तिसऱ्या स्थानी दाखल झाला आहे. त्याचे ९०० गुण झाले आहेत. विराट (९२२ गुण), केन विल्यमसन (९१३ गुण) यांच्यानंतर तो तिसºया स्थानी आहे. या कसोटीपुर्वी त्याचे ८५७ गुण होते.
भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी कायम आहे तर पुजाराची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. चेंडू छेडखानी प्रकरणात एक वर्षाच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे गेल्यानंतर पहिला कसोटी सामना खेळणाºया स्मिथने १४४ व १४२ धावांची खेळी केली. तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
कसोटी सामन्यात ९ बळी घेणाºया आॅस्ट्रेलियाच्या नॅथन लियोनने सहा स्थानांची प्रगती करीत १३ वे स्थान गाठले आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सामन्यात सात बळी घेत अव्वल स्थान अधिक मजबूत केले आहे. तो कारकीर्दीतील सर्वोत्तम ८९८ गुणांवर पोहोचला आहे. गेल्या ५० वर्षांत ग्लेन मॅक् ग्रा व शेन वॉर्न यांच्यानंतर तिसरा सर्वाधिक मानांकन गुण मिळवणारा आॅस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात १३३ धावा फटकावणारा सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्सने २५ स्थानांची प्रगती केली असून तो कारकीर्दीतील सर्वोत्तम ८१ व्या स्थानी दाखल झाला आहे. या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध बळींचे शतक पूर्ण करणाºया स्टुअर्ट ब्रॉडने दोन स्थानांची प्रगती करीत १६ वे स्थान गाठले आहे. सामन्यात चार बळी घेणारा ख्रिस व्होक्सने चार स्थानांची प्रगती केली असून तो २९ व्या स्थानी आहे. व्होक्स अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत मायदेशातील सहकारी मोईन अलीला पिछाडीवर सोडत नवव्या स्थानी दाखल झाला आहे. (वृत्तसंस्था)
स्मिथचे ९०० गुण
या कसोटीपूर्वी त्याच्या नावावर ८५७ मानांकन गुणांची नोंद होती. सामन्यानंतर तो सध्याच्या क्रमवारीत ९०० पेक्षा अधिक मानांकन गुणांची नोंद असलेला तिसरा खेळाडू आहे. कोहली (९२२) आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (९१३) यांच्या व्यतिरिक्त स्मिथ (९०३) यांच्या नावावर ९०० पेक्षा अधिक मानांकन अंक आहेत.
Web Title: Smith placed third in the Test rankings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.