ब्रिस्बेन : कर्णधार स्टिव्हन स्मिथच्या नाबाद अर्धशतकामुळे आॅस्ट्रेलियाने खराब सुरुवातीनंतर इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत ४ बाद १६५ असे पुनरागमन केले. गाबा येथे सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात ३०२ धावा केल्या. आॅस्ट्रेलियाने दुस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ४ बाद १६५ धावा केल्या. स्मिथ ६४ तर शॉन मार्श ४४ धावा करून खेळत होते. दोघांनी पाचव्या गड्यासाठी ८९ धावांची भागीदारी केली.कांगारू अजून १३७ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे सहा गडी शिल्लक आहेत. स्मिथने १४८ चेंडूंत सहा चौकार मारले. तर मार्शने १२२ चेंडूंत ७ चौकारांसह ४४ धावा केल्या. आॅसीची सुरुवात खराब झाली. पदार्पण करत असलेला सलामीवीर कॅमरन बेनक्राफ्ट (५), उस्मान ख्वाजा (११) आणि डेव्हिड वॉर्नर (२६) अपयशी ठरले. त्यानंतर पीटर हॅण्डकोम्बला पायचीत झाल्याने झाल्याने आॅसीची ४ बाद ७६ अशी अवस्था झाली होती. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- स्मिथने आॅसीला सावरले, इंग्लंडचा डाव ३०२ धावांत संपुष्टात
स्मिथने आॅसीला सावरले, इंग्लंडचा डाव ३०२ धावांत संपुष्टात
ब्रिस्बेन : कर्णधार स्टिव्हन स्मिथच्या नाबाद अर्धशतकामुळे आॅस्ट्रेलियाने खराब सुरुवातीनंतर इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत ४ बाद १६५ असे पुनरागमन केले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 3:51 AM