Join us  

भारताच्या Smriti Mandhana चा परदेशात डंका; असं करणारी पहिलीच भारतीय ठरली

Smriti Mandhana Joins Adelaide Strikers WBBL : स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 3:23 PM

Open in App

smriti mandhana wbbl 2024 : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना तिच्या नवीन इनिंगसाठी सज्ज आहे. आगामी महिला बिग बॅश लीगमध्ये तिला एडिलेड स्ट्रायकर्सच्या संघाने करारबद्ध केले. WBBL मध्ये स्मृतीचा हा चौथा संघ आहे, या आधी ती ब्रिस्बेन हीट, होबार्ट हरिकेंस आणि सिडनी थंडरकडून खेळली आहे. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर पुन्हा एकदा क्रिकेट खेळायला मिळाल्याने स्मृतीने आनंद व्यक्त केला. महिला प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला धडे देणाऱ्या ल्यूक विलियम्स यांच्यासोबत स्मृती पुन्हा एकदा जोडली गेली आहे. खरे तर पुन्हा एकदा विलियम्स यांच्या मार्गदर्शनाखाली खेळायला मिळत आहे याचा आनंद असल्याचे मानधनाने सांगितले. विशेष बाब म्हणजे यंदाच्यी BBL मध्ये खेळणारी स्मृती ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. 

महिलांच्या  बिग बॅश लीगमध्ये एडिलेड स्ट्रायकर्सच्या संघाची कामगिरी शानदार राहिली आहे. त्यांनी दोनवेळा किताब जिंकला आहे. स्पर्धेच्या आठव्या हंगामातील अंतिम सामन्यात सिडनी थंडर्सला नमवून पहिल्यांदा ट्रॉफी जिंकली होती. त्याच्या पुढील हंगामातही अप्रतिम खेळ करुन एडिलेडच्या संघाने ट्रॉफीचा बचाव केला. आता दहाव्या हंगामात किताब जिंकून विजयाची हॅटट्रिक मारण्याचे लक्ष्य त्यांच्यासमोर आहे. 

स्मृतीचा झंझावात कायमएडिलेड स्ट्रायकर्सच्या संघाचे प्रशिक्षक ल्यूक विलियम्स यांनी स्मृती मानधनाच्या खेळीचे तोंडभरुन कौतुक केले. स्मृतीने तिच्या खेळीने अनेकांना प्रभावित केले. आम्ही स्ट्रायकर्सच्या संघात तिचे स्वागत करतो. तिच्याकडे खूप अनुभव असून याचा संघाला फायदा होईल, असे विलियम्स यांनी सांगितले. दरम्यान, ऑस्ट्रेलियात स्मृतीने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. तिने सिडनी थंडरसाठी खेळताना मेलबर्नविरुद्ध ६४ चेंडूत ११४ नाबाद धावा केल्या होत्या. या स्पर्धेत तिने एकूण ७४८ धावा कुटल्या आहेत. 

टॅग्स :स्मृती मानधनाबिग बॅश लीगभारतीय क्रिकेट संघभारतीय महिला क्रिकेट संघ