Join us  

स्मृती आजी-आजोबांच्या भेटीला! मनधनाच्या पाठीवर शाबासकीची थाप

इंग्लड येथे झालेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल गाठणा-या भारतीय महिला संघाने इतिहास रचला. या ऐतिहासिक कामगिरीत मोलाचा वाटा उचणारी स्टार महिला फलंदाज स्मृती मनधना सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 7:20 AM

Open in App

बेळगाव : इंग्लड येथे झालेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल गाठणा-या भारतीय महिला संघाने इतिहास रचला. या ऐतिहासिक कामगिरीत मोलाचा वाटा उचणारी स्टार महिला फलंदाज स्मृती मनधना सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावरही तिचा चाहता वर्ग वाढला आहे. ही स्टार खेळाडू सध्या बेळगाव दौ-यावर आहे. मूळ सांगलीची असलेली स्मृती आपल्या आजी-आजोबांच्या घरी आली होती. बेळगावातील शहापूर हे स्मृतीचे आजोळ आहे. शहापूर येथील उद्योजक सत्य नारायण हेडा हे स्मृतीच्या आईचे वडील आहेत. तिला आजोबांची आठवण नेहमी येते. नातीने देशाचे नाव उज्ज्वल केले याचा अभिमान तिच्या आजोबांना आहे. कदाचित, यामुळे आजोबांनी तिला खास बोलावून घेतले असेल. महिनाभराच्या व्यस्त कार्यक्रमातून स्मृती आता आपल्या नातेवाईकांसाठी वेळ घालवत आहे. आपल्या आजी-आजोबांसोबत तिने फोटोही काढून घेतला. केकही कापला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. नातीचे कौतुक करीत त्यांनी स्मृतीच्या पाठीवर शाबासकी थाप मारली.