Join us

 जिच्यासोबत तोऱ्यात मिरवताना दिसली तिच्यामुळंच पडला स्मृतीचा चेहरा (VIDEO)

भारतीय महिला संघातील स्टार बॅटर आणि उप कॅप्टन स्मृती मानधना सध्या बिग बॅश लीग (WBBL) मध्ये खेळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 15:52 IST

Open in App

भारतीय महिला संघातील स्टार बॅटर आणि उप कॅप्टन स्मृती मानधना सध्या बिग बॅश लीग (WBBL) मध्ये खेळत आहे. १९ नोव्हेंबरला रंगलेल्या सामन्यात अ‍ॅडलेड स्ट्रायकर्सकडून खेळणाऱ्या स्मृती मानधना हिने पर्थ स्कॉचर्स विरुद्ध अगदी तोऱ्यात बॅटिंग केली. पण अर्धशतकाच्या जवळ पोहचली असताना ती बाद झाली. WPL स्पर्धेत जिच्यासोबत तोऱ्यात मिरवताना दिसली तिनेच स्मृतीला आउट केले. विकेट गमावल्यावर स्मृतीचा चेहराच पडला. 

अर्धशतकाची संधी निर्माण झाली असताना फसली स्मृती मानधना

अ‍ॅडलेड स्ट्रायकर्सच्या डावातील १० व्या षटकात स्मृतीच्या रुपात संघाला मोठा धक्का बसला. तिला बाद करणारी बॉल दुसरी तिसरी कोणी नसून ती होती बिग बॅश लीगमध्ये स्कॉर्चर्स संघाचे नेतृत्व करणारी न्यूझीलंडची  सोफी डिव्हाइन. तिने टाकलेला ओव्हरपिच चेंडू  स्मृतीनं  मिड-ऑफच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न केला. पण एबोनी हॉस्किनने एक सोपा झेल घेतला अन् स्मृतीला पॅव्हेलियनचा रस्ता धरावा लागला.  

स्मृती अन् सोफी दोघींची दमदार कामगिरी विकेट गमावण्याआधी स्मृती मानधना हिने या सामन्यात १४१.३८ च्या स्ट्राइक रेटनं २९ चेंडूत ४१ धावांची क्लास खेळी केली. तिचे अर्धशतक ९ धावांनी हुकले. या खेळीत तिने  एक उत्तुंग षटकार आणि ५ चौकार मारल्याचे पाहायला मिळाले. स्मृती मंधाना हिने होबार्ट हरिकेन्सविरुद्धच्या अर्धशतकासह WBBL स्पर्धेतील पाच डावांत १४४ धावा केल्या आहेत. दुसरीकडे  सोफी डेव्हिन हिने बॉलिंगसह बॅटिंगमध्ये आपली छाप सोडलीये.  स्मृतीच्या संघाविरुद्ध खेळताना सोफीनं २८ धावा खर्च करून २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. या दोघी WPL मध्ये RCB कडून एकत्र खेळताना दिसल्या आहेत. पण आता  त्या वेगवेगळ्या संघातून खेळत आहेत.

सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूनं लागला?

स्मृती मानधना, केटी मॅक आणि लॉरा वोल्वार्ड यांनी केलेल्या ४० पेक्षा अधिक धावांच्या जोरावर अ‍ॅडलेड स्ट्रायकर्स संघानं या सामन्यात निर्धारित २० षटकात ६ बाद १६९ धावा करत पर्थ स्कॉचर्ससमोर १७० धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना स्कॉचर्स संघाला निर्धारित २० षटकात ८ बाद १३९ धावांपर्यंतच मजल मारता आली.

टॅग्स :स्मृती मानधनामहिला टी-२० क्रिकेटमहिला प्रीमिअर लीग