Join us  

Smriti Mandhana, Jay Shah: 'पुरस्कार मिळाल्याचा आनंदच पण विशेष अभिनंदन यासाठी की...'; जय शाह यांनी स्मृती मानधनाचं एका खास कारणासाठी केलं कौतुक

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव यानेही स्मृतीला ट्वीट करत शुभेच्छा दिल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 8:20 PM

Open in App

Smriti Mandhana, ICC women’s cricketer of the year  - भारतीय क्रिकेटसाठी २०२१ हे वर्ष फारसं चांगलं गेलं नाही. पण आज भारताच्या स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) भारतीय क्रिकेटप्रेमींना जल्लोष करण्याची संधी दिली. स्मृतीला वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूला दिला जाणारा राचेल हेयहो फ्लिंट ट्रॉफी (Rachael Heyhoe Flint Trophy) हा पुरस्कार जाहीर झाला. ICC कडून २०२१ या सालातील पुरस्कारांची घोषणा सोमवारी करण्यात आली. त्यात पुरुष वन डे क्रिकेटपटूचा पुरस्कार बाबर आजमला तर सर्वात्तम कसोटी खेळाडूचा पुरस्कार जो रुटला मिळाला. २०२१ च्या आयसीसी पुरस्कारांमध्ये आर अश्विन वगळता भारताच्या एकाही पुरुष क्रिकेटरला साधं नामांकनही मिळालं नाही. पण स्मृतीने मात्र २०१८ नंतर दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला.

स्मृती मानधनाने २०२१ या वर्षात दमदार कामगिरी करून दाखवली. तिला मिळालेल्या पुरस्कारासाठी तिचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आलं. BCCI चे सचिव जय शाह यांनी स्मृतीचे ट्वीट करत अभिनंदन केलं. ICC Player of the Year 2021 पुरस्कार मिळाल्याबद्दल स्मृती मानधनाचं अभिनंदन. तसेच, हा पुरस्कार दोन वेळा पटकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटून ठरल्याबद्दल विशेष कौतुक. स्मृतीने वर्षभरात जे परिश्रम घेतले त्याचेच चांगले फळ तिला मिळाले. तिला शुभेच्छा, असं ट्वीट जय शाह यांनी केलं.

याशिवाय, भारताच्या पुरूष संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव, गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि इतरांनीही तिला ट्वीट करत शुभेच्छा दिल्या. तसंच तिच्यावर स्तुतीसुमनं उधळली. स्मृती मानधनाचं खूप कौतुक आणि अभिनंदन. तू खरंच स्टार आहेस, असं साऱ्यांनी ट्वीट केलं.

--

--

दरम्यान, स्मृतीने गेल्या वर्षात दमदार कामगिरी करून दाखवली. तिने २२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३९ च्या सरासरीने ८५५ धावा केल्या. या कामगिरीत तिने एकदा शतक ठोकलं. तर ५ वेळ अर्धशतकी खेळ केला.

टॅग्स :स्मृती मानधनाजय शाहबीसीसीआयआयसीसी
Open in App