भारत-वेस्ट इंडिज महिला संघातील दुसऱ्या वनडे सामन्यात स्मृती मानधना आणि प्रतिका रावल ही जोडी चांगलीच जमली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. पण उत्तमरित्या सेट झाल्यावर दोघींच्यातील ताळमेळ ढासळला. याची किंमत स्मृती मानधनाला आपल्या विकेटच्या रुपात चुकवावी लागली. मोठी खेळी करण्याच्या दिशेनं पाऊल टाकतीये असं वाटत असताना स्मृती मानधनाला अर्धशतकानंतर लगेच पॅव्हेलियनचा रस्ता धरावा लागला. तिने ४७ चेंडूत ५३ धावांची खेळी केली.
१७ व्या षटकात 'गडब-घोटाळा'
भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतल्यावर अनुभवी स्मृती मानधना हिने युवा प्रतिकाच्या साथीनं भारताच्या डावाची सुरुवात केली. दोघींनी अगदी तोऱ्यात बॅटिंगकरत संघासाठी शतकी भागीदारी रचली. दोघींपैकी एकीचीही विकेट घेणं वेस्ट इंडिजच्या ताफ्यातील गोलंदाजांसाठी आव्हानात्मक झालं होते. पण गडबड घोटाळा झाला अन् दोघींच्यातील ताळमेळाच्या अभावाचा वेस्ट इंडिज संघाला फायदा मिळाला. १७ व्या षटकात भारतीय संघाच्या धावफलकावर ११० धावा लागल्या असताना स्मृती मानधना रन आउट झाली.
दोघींनी एकमेकींसाठी उचललं पाऊल
१७ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर प्रतिका रावल हिने चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं टोलावला. पहिली धाव घेतल्यावर तिने स्मृतीला दुसऱ्या धावेसाठी बोलावले. पण धाव होणार नाही हे लक्षात आल्यावर ती स्मृतीला परत पाठवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत स्मृती मानधना खूपच पुढे आली होती. दुसरा वनडे सामना खेळणारी प्रतिकानं अनुभवी स्मृतीची विकेट वाचवण्यासाठी स्वत:ची विकेटचा त्याग देण्याचा डावही खेळला. पण त्याच वेळी स्मृतीही मागे फिरली अन् तिने रन आउटच्या रुपात आपली विकेट गमावली. चूक कुणाची यापेक्षा दोघींनी एकमेकींसाठी उचललेलं पाऊल एकदम खास अन् टीम स्पीरिट दाखवून देणारे होते.
स्मृतीनं राग मनात न धरता युवा बॅटरची थोपटली पाठ
क्रिकेटच्या मैदानात ताळमेळातील अभावामुळे रन आउटच्या रुपात विकेट गमावल्यावर अनेकदा बॅटरला राग येतो. अनेक खेळाडू मैदानात नाराजीही व्यक्त करतात. पण स्मृतीनं आपला कूल अंदाजात पॅव्हिलियनचा रस्ता धरला. एवढेच नाही तर तिने युवा बॅटरला झाल ते विसरून जा अन् खेळावर फोकस कर, असा काहीसा संदेश देत पाठ थोपटली. हा सीनही एकदम भारी होता. त्यानंतर प्रतिका रावल हिने ८६ चेंडूत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७६ धावांची खेळी करत वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले.
Web Title: Smriti Mandhana Sacrifices Her Wicket For Pratika Rawal Run-Out In IND Vs WI 2nd ODI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.