वोर्सेस्टर: भारतीय महिला क्रिकेट टीमने इंग्लंडला (INDw vs ENGw 3rd ODI) तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे मध्ये पराभूत केले. मात्र, भारतीय संघाला ही सिरीज १-२ अशी गमवावी लागली. (Smriti Mandhana took an unbeaten catch, video goes viral.)
भारताकडून कप्तान मिताली राज (Mithali Raj) हिने नाबाद ७५ अशी सर्वाधिक रनची खेळी केली. मितालीने ८६ चेंडूत ८ चौकार लगावले. तर टीम इंडियाची ओपनर फलंदाज स्मृति मंधाना (Smriti Mandhana) ने ५७ चेंडूवर ४९ रन बनविले. मंधानाने या खेळीमध्ये ८ चौकार लगावले.
मात्र, या मॅचमध्ये मंधानाने टिपलेला एक झेल खूप चर्चेत राहिला आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. मंधानाने इंग्लंडची फलंदाजी सुरु असताना ३८ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मिडविकेटवर डाव्या बाजुला हवेत झेप घेत नेट सिवर (Nat Sciver) चा सुंदर झेट टिपला. या तिने कॅच पकडल्याची खूप स्तुती होत आहे. दीप्ती शर्माच्या (Deepti Sharma) चेंडूवर सिवरने पुढे येत मिडविकेटच्या दिशेने चेंडू फटकावला होता. यावेळी मंधानाने धावत जात डाव्या बाजुला झेप घेत कॅच पकडली. सिवर ४९ रनवर आऊट झाली.
भारतीय संघाने तीन चेंडू बाकी ठेवत विजय मिळविला. दीप्ती शर्माने ३ बळी टिपले. गोलंदाजांच्या बळावर भारतीय संघाने इंग्लंडला 219 वर रोखले. भारताने या लक्ष्याचा पाठलाग करताना 46.3 ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून सामना जिंकला.