Same to Same! विराटसारखी बॉलिंग अन् स्मृती मानधनानं घेतली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट, Video 

स्मृतीचे हे आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील सातवे शतक ठरले. भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावण्या महिला क्रिकेटपटूंच्या यादीत तिने अव्वल स्थानी असलेल्या मिताली राजसोबत बरोबरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 07:59 PM2024-06-19T19:59:47+5:302024-06-19T20:00:10+5:30

whatsapp join usJoin us
Smriti Mandhana takes wicket in first-ever over in international cricket, The similar bowling action of Virat Kohli and Smriti, Video  | Same to Same! विराटसारखी बॉलिंग अन् स्मृती मानधनानं घेतली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट, Video 

Same to Same! विराटसारखी बॉलिंग अन् स्मृती मानधनानं घेतली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिच्या पहिल्याच षटकात विकेट घेतली. ३२५ धावसंख्येचा बचाव करताना, भारताने तझमिन ब्रिट्स ( ११ चेंडूत ५) आणि अनेके बॉश ( २३ चेंडूत १८) यांना बाद करून दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला.  

Smriti Mandhana create History! स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी; सचिन, रोहितच्या विक्रमाशी बरोबरी; मिताली राजला टाकले माघारी

सामना नियंत्रणात असल्याचे पाहून, कर्णधार हरमनप्रीत कौरने मानधनाला गोलंदाजीसाठी आणले. स्मृतीने तिच्या पहिल्याच षटकात विकेट घेतली आणि तिची गोलंदाजी पाहून लोकांना विराट कोहलीच्या बॉलिंग अॅक्शनची आठवण झाली. वन डे सामन्यात शतक अन् विकेट घेणारी स्मृती मानधना ही तिसरी भारतीय महिला ठरली. हरमनप्रीत कौर ( वि. बांगलादेश, २०१३) आणि दीप्ती शर्मा ( वि. आयर्लंड, २०१७) यांनी असा पराक्रम केला आहे.  स्मृतीने १५व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सून ल्यूस ( १२) हिची विकेट घेतली.  


भारताने २३ षटकांत १००/२ अशी मजल मारल्यानंतर हरमनप्रीत आणि मानधाना यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३६ चेंडूंत १७१ धावांची जबरदस्त भागीदारी केली. त्यांच्या जबरदस्त खेळीमुळे यजमानांनी निर्धारित ५० षटकांत ३ बाद ३२५ अशी मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने ४१ षटकांत ३ बाद २३१ धावा केल्या आहेत.  कर्णधार लॉरा वोल्व्हार्ड्ट ११२ चेंडूंत ९ चौकारांसह ८८ धावांवर खेळतेय, तर मारिझाने कॅप ८७ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह १०२ धावांवर नाबाद आहे. दक्षिण आफ्रिकेला ५२ चेंडूंत ८९ धावा विजयसाठी हव्या आहेत. 

Web Title: Smriti Mandhana takes wicket in first-ever over in international cricket, The similar bowling action of Virat Kohli and Smriti, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.