एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिच्या पहिल्याच षटकात विकेट घेतली. ३२५ धावसंख्येचा बचाव करताना, भारताने तझमिन ब्रिट्स ( ११ चेंडूत ५) आणि अनेके बॉश ( २३ चेंडूत १८) यांना बाद करून दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला.
सामना नियंत्रणात असल्याचे पाहून, कर्णधार हरमनप्रीत कौरने मानधनाला गोलंदाजीसाठी आणले. स्मृतीने तिच्या पहिल्याच षटकात विकेट घेतली आणि तिची गोलंदाजी पाहून लोकांना विराट कोहलीच्या बॉलिंग अॅक्शनची आठवण झाली. वन डे सामन्यात शतक अन् विकेट घेणारी स्मृती मानधना ही तिसरी भारतीय महिला ठरली. हरमनप्रीत कौर ( वि. बांगलादेश, २०१३) आणि दीप्ती शर्मा ( वि. आयर्लंड, २०१७) यांनी असा पराक्रम केला आहे. स्मृतीने १५व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सून ल्यूस ( १२) हिची विकेट घेतली.