शाब्बास पोरी! स्मृती मानधनाची ICC Rankings मध्ये गगन भरारी; ऑस्ट्रेलियाची केलीय धुलाई... 

ICC Women's Player Rankings - भारतीय महिला संघाने दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यात थरारक विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 03:25 PM2022-12-13T15:25:04+5:302022-12-13T15:25:51+5:30

whatsapp join usJoin us
Smriti Mandhana touches career-best points; holds third place in ICC Rankings, she gained 11 rating points to reach the landmark | शाब्बास पोरी! स्मृती मानधनाची ICC Rankings मध्ये गगन भरारी; ऑस्ट्रेलियाची केलीय धुलाई... 

शाब्बास पोरी! स्मृती मानधनाची ICC Rankings मध्ये गगन भरारी; ऑस्ट्रेलियाची केलीय धुलाई... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Women's Player Rankings - भारतीय महिला संघाने दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यात थरारक विजयाची नोंद केली. भारतीय महिलांनी कमाल करताना सुपर ओव्हरमध्ये ही मॅच जिंकली. ऑस्ट्रेलियाच्या १/१८७ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ५/१८७ अशी टक्कर दिली. सुपर ओव्हर मध्ये भारताने २१ धावांचे लक्ष्य ठेवले आणि ऑस्ट्रेलियाला १६ धावा करता आल्या. भारताने हा सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. स्मृती मानधना ( Smriti Mandhana) ने निर्धारित २० षटकांत ७९ धावा आणि सुपर ओव्हरमध्ये १३ धावा करताना विजयात खूप मोठा वाटा उचलला. डी वाय पाटील स्टेडियमवर उपस्थित ४५०००+ प्रेक्षकांसमोर भारतीय महिलांनी दमदार कामगिरी केली आणि त्याचा फायदा आयसीसीच्या क्रमवारीत झालेला पाहायला मिळतोय... 

ICC ने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची ताहलिया मॅक्ग्राथ ही महिलांमध्ये नंबर वन ट्वेंटी-२० फलंदाज ठरली आहे. तिने सहकारी बेथ मूनीला दुसऱ्या स्थानावर ढकलले. भारताची स्टार फलंदाज स्मृतीने तिसरे स्थान कायम राखले आणि कारकीर्दितील सर्वाधिक ७४१ रेटिंग पॉईंट्सची कमाई केली. भारताच्या शेफाली वर्मानेही एक स्थान वर सरकताना ६५१ रेटींग पॉईंट्ससह सहावे स्थान पटकावले. जेमिमा रॉड्रीग्ज ६२४ रेटींग पॉईंट्ससह नवव्या स्थानावर आहे. 


ट्वेंटी-२० कारकीर्दित अवघ्य १६ सामन्यांत मॅक्ग्राथने नंबर वन स्थान पटकावले. २०११मध्ये मिताली राजनेही १६ सामन्यांत नंबर वन स्थान पटकावले होते. २७ वर्षीय मॅक्ग्राथ ही अव्वल स्थान पटकावणारी ऑस्ट्रेलियाची चौथी महिला फलंदाज ठरली. यापूर्वी कॅरेन रोल्टन, मेग लॅनिंग व बेथ यांनी हा पराक्रम केला आहे. मॅक्ग्राथने १२१.२५च्या सरासरीने ४८५ धावा केल्या आहेत. भारताविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात तिने नाबाद ७० धावांची खेळी केली होती. गोलंदाजांमध्ये भारताच्या दीप्ती शर्मा ( ७३२ गुण) व रेणुका सिंग ( ७१२) या दोघी अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. अष्टपैलू खेळाडूंमध्ये दीप्तीने ३७३ रेटींग पॉईंट्ससह दुसरे स्थान कायम राखले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Smriti Mandhana touches career-best points; holds third place in ICC Rankings, she gained 11 rating points to reach the landmark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.