ICC women’s cricketer of the year - भारताच्या स्मृती मानधनानं ( Smriti Mandhana) वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूला दिला जाणारा राचेल हेयहो फ्लिंट ट्रॉफी ( Rachael Heyhoe Flint Trophy ) पटकावली. आयसीसीनं 2021च्या पुरस्काराची घोषणा सोमवारी केली. त्यात पुरुष वन डे क्रिकेटपटूचा पुरस्कार बाबर आजमन, तर सर्वात्तम कसोटी खेळाडूचा पुरस्कार जो रुटनं पटकावला. 2021च्या आयसीसी पुरस्कारांमध्ये आर अश्विन वगळता एकाही पुरुष भारतीय खेळाडूला नामांकन मिळालेलं नाही. त्यात स्मृतीनं हा पुरस्कार पटकावून भारतीय क्रिकेटची लाज राखली. तीनं 2021मध्ये 22 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 38.86च्या सरासरीनं 855 धावा केल्या आहेत. त्यात एक शतक व 5 अर्धशतकांचा समावेश आहे. 2018मध्येही तिनं हा पुरस्कार पटकावला होता.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या एकाही खेळाडूचा या संघात समावेश नाही. स्मृती मानधनानं २०२१मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. तिनं ३१.८७च्या सरासरीनं २५५ धावा केल्या आहेत. त्यामुळेच तिची सलामीवीर म्हणून निवड केली गेली आहे.