Women's T20 Challenge : महिला ट्वेंटी-२० चॅलेंज लीगच्या पहिल्याच सामन्यात उत्तम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. सुपरनोव्हा संघाच्या प्रिया पुनिया व डिएंड्रा डॉटीन यांनी ट्रेलब्रेझर्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पुनिया व डॉटीन यांनी ४.५ षटकांत ५० धावा फलकावर झळकावल्या. पण, ६ चेंडूंत २६ धावा कुटणारी डॉटीन दुर्दैवीरित्या रन आऊट झाली. शर्मिन अख्तेरच्या अचूक थ्रो वर तिला माघारी जावं लागलं. त्यानंतर प्रिया पुनिया, हरमनप्रीत कौर यांनी चांगली फटकेबाजी करून महिला ट्वेंटी-२० लीगमध्ये विक्रमी धावसंख्या उभी केली.
हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला ट्वेंटी-२० चॅलेंज स्पर्धेत पहिला मुकाबला सुपरनोव्हा विरुद्ध ट्रेलब्रेझर्स यांच्यात होत आहे. प्रिया पुनिया आणि डिएंड्रा डॉटीन ( Deandra Dottin) यांनी सुपरनोव्हाला दणदणीत सुरुवात करून देताना ४.५ षटकांत ५० धावा फलकावर चढवल्या. पण, ५व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डॉटीनला घाई नडली. पुनियाने मारलेला चेंडू स्क्वेअऱ लेगला शर्मिन अख्तेरने अडवला, तोपर्यंत नॉन स्ट्रायकर एंडवरू डॉटीन बरीच पुढे आली होती. शर्मिने अचूक थ्रो करून डॉटीनला रन आऊट केले. डॉटीनने १७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३७ धावा केल्या. सुपरनोव्हाने पहिल्या पॉवर प्लेमध्ये १ बाद ५८ धावा केल्या. महिला ट्वेंटी-२० चॅलेंज लीगमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
हायली मॅथ्यूजने ८व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर प्रिया पुनियाचा त्रिफळा उडवला. तिने २० चेंडूंत २२ धावा केल्या. हर्लीन देओल व कर्णधार हरमनप्रीत कौर यांची २५ चेंडूंवरील ३७ धावांची भागीदारी सलमा खातूनने संपुष्टात आणली. हर्लीन १९ चेंडूंत ५ चौकारांसह ३५ धावा करून LBW झाली. पूजा वस्त्राकर १४ धावा करून माघारी परतला. त्याच षटकात हरमनप्रीत रन आऊट झाली. तिने २९ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. सुपरनोव्हाने १४७ धावांचा टप्पा ओलांडताच नवा विक्रम घडला. महिला ट्वेंटी-२० लीगमधील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी २०२०मध्ये उभय संघांमध्ये सुरनोव्हाने ६ बाद १४६ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०व्या षटकात तीन विकेट्स पडल्या. सुपरनोव्हाचे ५ फलंदाज अवघ्या ९ चेंडूंत माघारी परतले. मॅथ्यूने २९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. सुपरनोव्हाने सर्वबाद १६३ धावा केल्या.