Join us  

"मी तुझ्याशिवाय...", Smriti Mandhana च्या वाढदिवशी बॉयफ्रेंड पलाशची रोमँटिक पोस्ट

smriti mandhana birthday : स्मृती मानधना आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 7:16 PM

Open in App

smriti mandhana birthday photos : नॅशनल क्रश म्हणून क्रिकेट विश्वात प्रसिद्ध असणारी खेळाडू म्हणजे स्मृती मानधना... भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना तिच्या अप्रतिम खेळीने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. तिच्या सौंदर्यामुळे भारताची नॅशनल क्रश म्हणून तिला ओळख मिळाली. स्मृतीची एक झलक पाहण्यासाठी आतुर असलेल्या चाहत्यांनी आता मात्र 'नॅशनल क्रश'ची फिरकी घेतल्याचे दिसते; काही महिन्यांपूर्वी महिला प्रीमिअर लीगमध्ये (WPL 2024) स्मृती मानधनाच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने किताब जिंकला. स्मृती २८ वर्षांची झाली असून, आज गुरुवारी तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

क्रिकेटप्रेमी आपल्या आवडत्या खेळाडूला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत. अशातच स्मृतीचा प्रियकर पलाश मुच्छलनेही स्मृतीला शुभेच्छा दिल्या. त्याने काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. महिला प्रीमिअर लीगमध्ये आरसीबीला चॅम्पियन बनवण्यात कर्णधार स्मृतीचे मोठे योगदान आहे. स्पर्धेच्या दुसऱ्याच हंगामात स्मृती मानधनाने आरसीबीला ट्रॉफी जिंकवून दिली. पलाश शुभेच्छा देताना म्हणाला की, सुंदर मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस आणि मी तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही. 

दरम्यान, पलाश हा इंदौरचा रहिवाशी असून तो पेशाने एक गायक आहे. गतवर्षी २०२३ मध्ये स्मृती आणि पलांश दोघांच्या रिलेशनशीपचे वृत्त माध्यमांत आले. पलाशने एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाणे गाऊन ते स्मृतीला डेडिकेट केले होते, तर आय लव्ह यू टू स्मृती.. असेही त्याने म्हटले होते. महिला प्रीमिअर लीगमध्ये चॅम्पियन झाल्यानंतर दोघांमधील प्रेमाची जादू की झप्पी पाहायला मिळाली होती. 

टॅग्स :स्मृती मानधनाऑफ द फिल्डदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट