स्मृती मंधानाची इंग्लंडमध्ये फटकेबाजी, मात्र विक्रमाची हुलकावणी 

भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाने टी-20 सामन्यात इंग्लंडमध्ये तुफान फटकेबाजी केली. येथे सुरू असलेल्या महिलांच्या क्रिकेट सुपर लीगमध्ये पदार्पण करताना 20 चेंडूंत 48 धावा चोपून काढल्या. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 12:13 PM2018-07-23T12:13:43+5:302018-07-23T12:14:22+5:30

whatsapp join usJoin us
Smriti Mandhana's incredible innings in England, but miss record | स्मृती मंधानाची इंग्लंडमध्ये फटकेबाजी, मात्र विक्रमाची हुलकावणी 

स्मृती मंधानाची इंग्लंडमध्ये फटकेबाजी, मात्र विक्रमाची हुलकावणी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देइंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून आयोजित करण्यात येणा-या लीगमध्ये खेळणारी स्मृती ही पहिली भारतीय खेळाडू आहे.

लंडन - भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाने टी-20 सामन्यात इंग्लंडमध्ये तुफान फटकेबाजी केली. येथे सुरू असलेल्या महिलांच्या क्रिकेट सुपर लीगमध्ये पदार्पण करताना 20 चेंडूंत 48 धावा चोपून काढल्या. 
 



वेस्टर्न स्टॉर्म क्लबचे प्रतिनिधित्व करणा-या स्मृतीने आपल्या या खेळीत पाच षटकार आणि तीन चौकार लगावले. मात्र तिला क्रिकेट सुपर लीगमध्ये जलद अर्धशतक करण्याचा विक्रम नोंदवता आलेला नाही. या लीगमध्ये 22 चेंडूंत अर्धशतक करण्याचा विक्रम आहे.  


स्मृतीच्या या खेळीच्या जोरावर तिच्या संघाने यॉर्कशर डायमंडविरूद्ध सात विकेट राखून विजय मिळवला. स्मृती आणि रेचल प्रीस्ट यांनी वेस्टर्न स्टॉर्मच्या डावाची सुरूवात केली, परंतु 163 धावांचा पाठलाग करताना प्रीस्ट पहिल्याच चेंडूवर माघारी फिरली. त्यानंतर स्मृती आणि हिदर नाइटने दुस-या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. स्मृती बाद झाल्यानंतर नाइटने 97 धावा केल्या. वेस्टर्न स्टॉर्मने 3 बाद 166 धावा करून हा सामना जिंकला. 


इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून आयोजित करण्यात येणा-या लीगमध्ये खेळणारी स्मृती ही पहिली भारतीय खेळाडू आहे. याआधी हरमनप्रीत कौरला सरे स्टर्स संघाने करारबद्ध केले होते, परंतु खांद्याच्या दुखापतीमुळे तिला एकही सामना खेळता आला नव्हता.  

Web Title: Smriti Mandhana's incredible innings in England, but miss record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.