Snake in Cricket match Viral video: लंका प्रीमियर लीग (LPL) 2023 सध्या श्रीलंकेत खेळली जात आहे. लीगमध्ये सोमवारी गॅले टायटन्स आणि डंबुला ऑरा या संघांमध्ये सामना झाला. या सामन्या दरम्यान एक भितीदायक दृश्य पाहायला मिळाले. लाइव्ह सामन्यादरम्यान एक लांबलचक साप मैदानात घुसला, ज्याला पाहून खेळाडूंची तारांबळ उडाली. गॅले टायटन्स आणि डंबुला ऑरा यांच्यातील सामना सुपर ओव्हरमध्ये संपला. रोमहर्षक चकमकीत गॉल टायटन्सने विजय मिळवला. या सामन्यात डंबुलाच्या डावात अष्टपैलू शाकिब अल हसन गोलंदाजी करत होता. त्याला मैदानात साप दिसला आणि त्यानंतर ही घटना पाहून चाहते, समालोचक आणि खेळाडू चक्रावले.
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मैदानात एक लांब साप दिसत आहे. शाकिब अल हसनने हाताने इशारा करून सापाविषयी पंचांना सांगितले, त्यानंतर अंपायरने सापाला मैदानाबाहेर नेले. पाहा व्हिडीओ-
भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने ट्विट करून या घटनेवर ट्विट केले आणि मजेशीर आनंद घेतला. दिनेश कार्तिकने लिहिले की, 'साप परत आला. मला वाटते हा प्रकार बांगलादेशात आहे. पण खरं तर, बांगलादेशी खेळाडूंना विजयानंतर नागिन डान्स करताना अनेकदा पाहिलं आहे त्यामुळे हे तेच असेल मला वाटलं.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना गॅले टायटन्सने 5 गडी गमावून 180 धावा केल्या. गॅले टायटन्सकडून भानुका राजपक्षेने 48 आणि कर्णधार दासून शनाकाने 42 धावा केल्या. 180 धावांच्या प्रत्युत्तरात डंबुला ऑराचा संघही 20 षटकांत केवळ 180 धावाच करू शकला. त्यानंतर सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला.