Sneha Deepthi, Delhi Capitals । मुंबई : महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिची सहकारी स्नेहा दीप्तीसोबत पाऊल ठेवले. मात्र, 2 वर्षांच्या मुलीची आई आता महिला प्रीमियर लीगमध्ये (Women's Premier League 2023) शानदार कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. आंध्रप्रदेशच्या या खेळाडूने 2013 मध्ये बांगलादेशविरूद्धच्या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले होते. परंतु, ती 2 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय आणि एक वन डे सामना खेळल्यानंतर संघातून बाहेर झाली. त्यानंतर तिने देशांतर्गत सामन्यांमध्ये आंध्रप्रदेशचे नेतृत्व करण्यास सुरूवात केली. तिने राज्यासाठी तिचा पहिला सामना नोव्हेंबर 2021 मध्ये खेळला होता.
दरम्यान, जेव्हा WPL लिलाव जाहीर झाला तेव्हा दीप्तीने आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आणि दिल्ली कॅपिटल्सने या 26 वर्षीय खेळाडूसाठी 30 लाखांची बोली लावली. दोन वर्षांची मुलगी क्रिवाची आई दीप्तीने 4 मार्चपासून सुरू होणाऱ्या WPL साठी दिल्लीस्थित फ्रँचायझीसोबत सराव सुरू केला आहे.
"मुलीला घरी सोडून येणे खूप कठीण होते"
दिल्ली कॅपिटल्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दीप्तीने मुलीला सोडून येणे किती कठीण आहे याबाबत सांगितले. तिने म्हटले, "माझ्या मुलीला घरी सोडून इथे येणे माझ्यासाठी खूप कठीण होते पण मी माझ्या करिअरला प्राधान्य देण्यासाठी आणि इतरांना प्रेरणा देण्यासाठी हे करायचे ठरवले. मी मुंबईतील संघाच्या हॉटेलकडे निघाले तेव्हा ती रडायला लागली. त्यामुळे जाऊ की नको याचा विचार करू लागले. माझ्यासाठी क्रिकेट आणि कुटुंब या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एवढा प्रवास केला असेल तर पुढे जायला हवे, असे मला वाटले. मला खेळाचा पूर्ण आनंद घ्यायचा आहे. मला माहित आहे की जर मी येथे चांगली कामगिरी केली तर ते माझ्यासाठी नवीन मार्ग उघडेल. मुलगी क्रिवाला घरी सोडणे कठीण होते पण माझ्या पतीने सांगितले की मी आपल्या मुलीची काळजी घेईल."
हॉटेलमध्ये निघून गेल्यानंतर पाच मिनिटांनी तिने तिच्या पतीला फोन करून क्रिवाबद्दल विचारले. पण मुलीच्या तोंडून जे ऐकले ते ऐकून दीप्ती देखील भावूक झाली. ती म्हणाली, "मी क्रिवाला पाच मिनिटांनी कॉल केला आणि तेव्हा ती हसत होती. तेलगूमध्ये तो बागा आडू म्हणाली म्हणजे चांगले खेळ. दीप्तीला महिला प्रीमियर लीगमध्ये कोट्यवधी रुपये मिळाले नाहीत, पण क्रिकेटच्या मैदानात परतणे हे तिच्यासाठी समाधानकारक आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Sneha Deepthi, who made her Indian debut alongside Smriti Mandhana, will play for Delhi Capitals in Women's Premier League 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.