कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट स्पर्धांना ब्रेक लागलेला आहे. त्यामुळे क्रिकेटपटू घरीच आहेत. त्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून ते एकमेकांशी, चाहत्यांशी संवाद साधत आहेत. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल हा त्याच्या मस्तीखोर स्वभावामुळे ओळखला जातो. त्यामुळेच अनेकदा खेळाडूंच्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये त्याची मजेशीर कमेंट पाहायला मिळते. रोहित शर्मा आणि त्याच्या मस्तीचे अनेक किस्से सांगता येतील. शिवाय टिकटॉकवरही त्याचे व्हिडीओ धुमाकूळ घालत आहेत. पण, गुरुवारी चहल वेगळ्या कारणानं चर्चेत आला आहे. त्यानं त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय आणि तो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
युजवेंद्र चहलनं काही दिवसांपूर्वी कॅटरिना कैफच्या इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये मॅसेज करून सर्वांना धक्का दिला होता. त्यावरून रोहितनं त्याची फिरकी घेतली होती. रोहित नेहमची चहलची फिरकी घेतो आणि चहलही तितक्याच खिलाडूवृत्तीनं त्याला उत्तर देतो. रोहितनं एकदा चहलला त्याच्या लग्नाबद्दलही विचारले होते. तेव्हा मुलगी पसंत पडली की कळवतो,असं उत्तर दिलं होतं.
काही दिवसांपूर्वी कॅटरिना लाईव्ह चॅटमध्ये शारीरिक तंदुरूस्तीबाबत सल्ला देत होती. त्यावेळी चहलनं मधीच मॅसेज केला. त्यानं लिहीलं की,''हाय कॅटरिना मॅम'' 2017मध्ये एका मुलाखतीत चहलनं त्याला कॅटरिनाचे हास्य आवडत असल्याचे सांगितले होते. यापूर्वी चहलनं अऩुष्का शर्मा हिच्या लाईव्ह चॅटमध्येही असाच मॅसेज पाठवला होता. अनुष्कानं एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात ती कोहलीला चौका मार ना, असे चिअर करताना पाहायला मिळाली होती. त्यावरून चहलनं अनुष्काकडे एक विनंती केली. पुढच्या वेळेस चहलला ओपनिंगला पाठव अशी इच्छा कोहलीकडे व्यक्त कर, असं चहलनं लिहीले होते.
गुरुवारी चहलनं एक फोटो पोस्ट केला. त्यात त्यानं रोहित शर्माला मुलगी बनवलेलं पाहायला मिळत आहे. चहलच्या या कलाकृतीवर नेटिझन्सनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Big News : सात वर्षांच्या बंदीनंतर एस श्रीसंतचे संघात पुनरागमन होणार
कोरोना पॉझिटिव्ह शाहिद आफ्रिदीचा नवा व्हिडीओ व्हायरल; म्हणतो, 'त्या' सर्व अफवा!
निसर्ग वादळात उद्ध्वस्त झालेलं गाव पुन्हा उभं करण्यासाठी पृथ्वी शॉचा पुढाकार!
शहीद जवानाचे वडील म्हणाले, नातवंडांनाही लढायला पाठवणार... वीरूने केला 'बापमाणसा'ला सलाम
पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली बनला 'स्ट्रीट डान्सर'; Video Viral
भन्नाट Video : लेफ्ट-राईट नव्हे, तर मोहम्मद रफी यांच्या गाण्यावर दिलं जातंय पोलीस प्रशिक्षण