मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला जबर दणका दिला आहे. काल बीसीसीआयने खेळाडूंसाठी नवी आर्थिक कराराची यादी आज जाहीर केली. या यादीत ए प्लस, ए, बी आणि सी अशा चार श्रेणींमध्ये खेळाडूंची विभागणी करण्यात आली आहे. पण ए प्लस या यादीत महेंद्रसिंह धोनीला स्थान देण्यात आलेलं नसल्याने क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या कॉन्ट्रॅक्टमध्ये ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना 7 कोटी, ए श्रेणीच्या खेळाडूंना 5 कोटी, बी श्रेणीच्या खेळाडूंना 3 कोटी तर सी श्रेणीच्या खेळाडूंना 1 कोटींचं मानधन जाहीर करण्यात आलं.धोनीला ए ग्रेडमध्ये ठेवण्यात आल्याने आता त्याला 5 कोटी मानधन वर्षाला मिळणार आहे. त्याला ए प्लस यादीत स्थान देण्यात न आल्याने सध्या याबाबत बरीच उलटसुलट चर्चा सुरु आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि बुमरा हे सध्या तीनही फॉर्मेटमध्ये खेळतात. त्यामुळे या पाचही खेळाडूंना ए प्लस यादीत स्थान देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे पत्नीने केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या मोहम्मद शमीला आर्थिक कराराच्या यादीतून बाहेर करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे युवराज सिंग यालाही सर्व श्रेणीतून वगळण्यात आले आहे.
कोणत्या श्रेणीत कोणते खेळाडू -
A+ श्रेणी – विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, शिखर धवन, आणि भुवनेश्वर कुमार
A श्रेणी – महेंद्रसिंह धोनी, आर. आश्विन, रविंद्र जाडेजा, वृद्धिमान साहा, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे.
B श्रेणी – लोकेश राहुल, दिनेश कार्तिक,उमेश यादव, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, इशांत शर्मा.
C श्रेणी – सुरेश रैना, केदार जाधव, मनिष पांडे, अक्षर पटेल, करुण नायर, जयंत यादव, पार्थिव पटेल.
Web Title: So Dhoni should be paid less than Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.