नवी दिल्ली, दि. 22 : सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाने बीसीसीआयकडे तक्रार दाखल केली आहे. भारतीय संघाची ऑफिशिअल किट स्पॉन्सर कंपनी नायकेवर खेळाडू नाराज आहेत. त्याबद्दल त्यांनी बीसीसीआयकडे नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये त्यांनी नायकेच्या किटसोबत खेळणं अशक्य असल्याचं सांगितले आहे. नायकेचा बीसीसीआयसोबतचा करार 1 जानेवारी 2016 रोजी झाला, जो 30 सप्टेंबर 2020 पर्यंत कायम असेल. नायकेकडून भारताच्या एका सामन्यावर 87 लाख 34 हजार रुपये खर्च केले जातात.
भारतीय संघाने नायकेविरोधात केलेली तक्रार बीसीसीआयने गांभीर्याने घेतल्याची माहिती समोर आली आहे. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जौहरी यांनी नायकेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून लवकरच याबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे.
जानेवारी 2006 पासून नायके भारतीय संघाची अधिकृत किट स्पॉन्सर आहे. नायकेनं 2006 ते 2020 या 16 वर्षासाठी 370 कोटींचा करार बीसीसीआयसोबत केला होता. भारतीय संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. तीन कसोटी सामन्याची मालिकेत भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. तर सध्या सुरु असलेल्य पाच वनडे मालिकेतील पहील्या सामन्यात 9 विकेटने विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
Web Title: So the Indian players are angry, complain to the BCCI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.