नवी दिल्ली : भारताविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात जॉनी बेअरस्टोला वगळण्याचा निर्णयावर टीका होत आहे. त्यात माजी कर्णधार केविन पीटरसन याने म्हटले की, जर इंग्लंडची निवड समिती भारताविरोधात आपला सर्वोत्तम संघ उतरवणार नसेल तर तो भारताचा एक प्रकारे अपमानच होईल.’ बेअरस्टोसोबतच अष्टपैलू सॅम कुर्रन, गोलंदाज मार्क वुड यांनादेखील संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. ईसीबीने खेळाडूंच्या व्यवस्थापन नीतीअंतर्गत बेअरस्टोला पहिल्या दोन कसोटींमध्ये विश्रांती दिली आहे.
पीटरसनने सांगितले की, भारताविरोधात पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया विरोधातील विजयासारखेच आहे. निवडकर्त्यांना स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांना खेळवण्याचा आग्रह केला आहे.पीटरसनने ट्विट केले की, ‘ इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारतविरोधात खेळण्यासाठी सर्वोत्तम संघ निवडला नाही. हा एक वादाचा मुद्दा आहे. भारतामध्ये विजय मिळवणे हे ऑस्ट्रेलियात विजय मिळवण्यासारखेच आहे. हा इंग्लिश चाहते आणि भारताचादेखील अपमान आहे. ब्रॉड व अँडरसन यांना खेळवायला हवे.’
बेअरस्टोबाबतच्या निर्णयावर पुनर्विचार करा- नासिर हुसेन
इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याच्या मते निवडकर्त्यांनी भारताविरोधातील कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिल्या दोन सामन्यात यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टो याला विश्रांती देण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. हुसेन याने सागितले की, बेअरस्टोला विश्रांती देण्याचा निर्णय घेऊन एक चूक केली आहे. त्याने मागच्या आठवड्यात गॉलमध्ये ४७ आणि नाबाद ३५ धावा केल्या होत्या. बेअरस्टो याला विश्रांती देणे हा ईसीबीच्या एका नीतीचा भाग आहे. इंग्लंडला या वर्षात १७ कसोटी आणि आयसीसी टी २० विश्वचषकात सहभागी व्हावे लागेल. हुसेन याने सांगितले की, माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की, तो फिरकीविरोधात खेळणाऱ्या इंग्लंडच्या तीन सर्वोत्तम फलंदाजांपैकी आहे. तो रुट आणि बेन स्टोंक्स यांच्या यादीत आहे. मात्र त्याला मायदेशी परतण्यास सांगितले आहे आणि बाकी संघ चेन्नईला जाणार आहे.’तो म्हणाला की, यावर पुनर्विचार करावा लागेल. खेळाडू कोविडच्या दु:स्वप्नातून बाहेर आले आहेत. त्यांना आयपीएल दरम्यान जैवसुरक्षित वातावरणात दिवस घालवावे लागले. त्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेत गेले. नंतर श्रीलंका आणि आता पुन्हा भारतात जात आहेत. नंतर आयपीएल खेळतील. मी या स्थितीला कमी म्हणत नाही.
Web Title: ... so it would be an insult to India - Kevin Pietersen
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.