Join us  

... त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियात इतिहास रचण्याची संधी

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. गेल्या 71 वर्षांत भारताला ऑस्ट्रेलियात एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 7:15 PM

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघ जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे तेव्हा स्मिथ आणि वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या संघात नसतील.

मुंबई : चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आहे. ही गोष्ट या दोघांच्या कारकिर्दीसाठी चांगली नसली तरी ती भारताच्या पथ्यावर पडणार आहे. कारण भारताचा संघ नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे भारताला यावेळी ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर इतिहास रचण्याची संधी आहे, असे म्हटले जात आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. गेल्या 71 वर्षांत भारताला ऑस्ट्रेलियात एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. भारतीय संघ जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे तेव्हा स्मिथ आणि वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या संघात नसतील. स्मिथ आणि वॉर्नर हे ऑस्ट्रेलियाचे अनुभवी खेळाडू आहेत.

भारताचा संघ जेव्हा 2014 साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा स्मिथने चार कसोटी सामन्यांमध्ये 769 धावा फटकावल्या होत्या. त्याचबरोबर वॉर्नर हा नेहमीच भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळे जर हे दोघे ऑस्ट्रेलियाच्या संघात नसतील तर भारतासाठी कसोटी मालिका जिंकणे थोडे सोपे होऊ शकते.

चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आहे. त्याचबरोबर हे काळे कृत्य करणाऱ्या कॅमेरुन बेनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालती आहे.

टॅग्स :चेंडूशी छेडछाडडेव्हिड वॉर्नरस्टीव्हन स्मिथ