नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणारा रोहित शर्मा हा आयपीएलमधला यशस्वी कर्णधार मानला जातो. ३३ वर्षांच्या रोहितने मुंबईला आयपीएलमध्ये चार वेळा विजेतेपद मिळवून दिले. अनेकदा काही माजी खेळाडूंनी टी-२० भारतीय संघाचे नेतृत्व रोहितकडे द्यावे अशी मागणी केली होती.
भारताचा माजी फलंदाज व्ही.व्ही.एस.लक्ष्मणनेही रोहितच्या खेळाचे कौतुक करत, दबाव झेलण्याच्या क्षमतेमुळे आयपीएलमध्ये तो यशस्वी कर्णधार ठरला, असे प्रशंसोद्गार काढले. ‘माझ्या मते, डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळत असताना रोहितमध्ये सर्वात प्रथम हे नेतृत्व कौशल्य निर्माण झाले. पहिल्या वर्षी तो संघात आला, तेव्हा तुलनेने नवीन होता.
तरीही मधल्या फळीत त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती पाहण्यासारखी होती. सुरुवातीच्या हंगामात डेक्कन चार्जर्सची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती, मात्र रोहितने स्वत:ची कामगिरी उंचावली. प्रत्येक सामन्यागणिक त्याचा आत्मविश्वास वाढत जातो. सहकाऱ्यांना विश्वास देतो, गोलंदाजांना मार्गदर्शन करतो हे पाहण्यासारखे आहे. महत्त्वाचे म्हणजे खडतर काळात स्वत:वर दबाव येऊ देत नाही. याच कारणामुळे आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार बनला,’ असे लक्ष्मणने स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले. (वृत्तसंस्था)
च्आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्यांच्या यादीत रोहित तिसºया स्थानावर असून त्याच्या १८८ सामन्यात ४,८९८ धावा आहेत. नाबाद १०९ ही त्याची सर्वोच्च खेळी.
Web Title: ... so Rohit is a successful IPL captain- Laxman
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.