जोहान्सबर्ग : जैविक रूपाने जर पूर्णपणे सुरक्षित वातावरण असेल तर क्रिकेट सामान्य पद्धतीने खेळता येईल. त्यात चेंडूला लकाकी आणण्यासाठी थुंकीचा वापर केला तर स्वास्थ्यसंबंधित जोखीम पत्करावी लागणार नाही, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शॉन पोलाकने व्यक्त केले.
इंग्लंड वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे आयोजन प्रेक्षकांविना बंद स्टेडियममध्ये जैविक रूपाने सुरक्षित वातावरणात करणार आहे आणि पोलाकने म्हटले आहे की, अशा वातावरणात कुठल्याही कृतीवर बंदी घालण्याची गरज नाही. ’फॉलोर्इंग आॅन क्रिकेट पोडकास्ट’मध्ये बोलताना पोलाक म्हणाला,‘जे वातावरण निर्माण केल्या जात आहे ते पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे असेल. लोकांची चाचणी घेण्यात येईल. ते दोन आठवड्यांसाठी शिबिरात असतील. जेथे शरीराच्या स्थितीतील बदलाचे निरीक्षण करण्यात येईल.’इंग्लंड अॅन्ड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) या दौऱ्यासाठी सावधगिरी बाळगत आहे. त्यात दौºयावर येणाºया खेळाडूंना १४ दिवस विलगीकरणात राहावे लागेल. सामन्यांसाठी हॉटेलची सुविधा असलेल्या स्टेडियमची निवड करण्यात येणार आहे.दक्षिण आफ्रिकेतर्फे ३०३ वन-डे व १०१ कसोटी सामने खेळणारा पोलाक म्हणाला,‘स्टेडियममध्ये कुणीच प्रेक्षक राहणार नाही आणि जेथे जातील तेथे दिशानिर्देशानुसार स्वच्छता राहील व सॅनिटाईझ केल्या जाईल, अशी मला आशा आहे. वेस्ट इंडिजचा महान वेगवान गोलंदाज मायकल होल्डिंगनेही याच प्रकारचे मत व्यक्त करताना म्हटले की, ज्यावेळी क्रिकेट जैव-सुरक्षित वातावरणात खेळले जाईल त्यावेळी थुंकीच्या वापरावर बंदी घालणे तर्कहीन आहे.’बुधवारी आयसीसी बोर्डाच्या बैठकीदरम्यान टी-२० विश्वकप स्पर्धेचा निर्णय व थुंकीच्या वापराबाबत प्रस्तावित बंदीवर निर्णय होण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)च्पोलाक म्हणाला, ‘जर आजाराचे कुठले लक्षण दिसले नाही तरी थुंकीचा वापर कुठली समस्या ठरायला नको. कारण तुम्ही जेथे कुठल्याही आजाराच्या संपर्कात आलेले नसाल, अशा वातावावरणात तुम्ही राहिलेला असाल. अशा स्थितीत तुम्ही सामान्य पद्धतीने क्रिकेट खेळू शकता.’