नवी दिल्ली -भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International cricket) अचानकपणे निवृत्तीची घोषणा केली. धोनी, हा भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. त्याने संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, धोनी हा आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार आहे. धोनीने आज सायंकाळी अचानकपणे निवृत्तीची घोषणा करताच ट्विटरवर (Twitter) #MSDhoni ट्रेंड झाला आहे. या ट्रेंडमध्ये चाहत्यांनी धोनी संदर्भात अनेक पोस्ट केल्या आहेत.
काही सोशल मीडिया यूझर्स तर धोनीच्या निवृत्तीची बातमी एकताच इमोशनल झाले आहेत. बघूया, धोनीच्या निवृत्तीवर काय आहेत चाहत्याच्या रिअॅक्शन्स.
इमोजी टाकत आणि आपल्या भावना व्यक्त करत श्रीयान सरन या ट्विटर युझरने म्हटले आहे, 'वुई मिस यू बॅडली माही भाई. थँक यू कॅप्टन, लीडर, लिजंड.. सर्व आठवणींसाठी! लव्ह यू मिस यू.. फॅन फॉरएव्हर!'
कुठल्याही प्रकारची औपचारिक घोषणा नाही. कुठल्याही प्रकारची पत्रकार परिषद नही. कुठल्याही प्रकारचा निरोपाचा भव्य सामना नाही आणि कुठल्याही प्रकारचे अखेरचे भाषण नाही. एकही सूचना नाही. हे तर तूही करू शकत होतास.
धोनीच्या काही चाहत्यांनी तर त्याच्या संपूर्ण कारकिर्दीचेच वर्णनच केले. लॉयल सचिन फॅन नावाच्या एका ट्विटर युझरने लिहिले आहे, 'टिकिट कलेक्टरपासून ते ट्रॉफी कलेक्टरपर्यंत व्यक्तीचा एक असाधारण प्रवास, ज्याने आम्हाला अभिमान वाटावा, असे बरेच काही दिले आहे. भारतीय क्रिकेटमध्ये त्याच्या योगदानाचे वर्णन करण्यासाठी पुरेसे शब्द नाहीत. सर्व आठवणींसाठी तुझे आभार.'
आठवणींसाठी आभार, आपण नेहमीच आमच्या हृदयात रहाल. वुई मिस यू धोनी
रईस शेख यांनी म्हटले आहे, थँक्यू प्रत्येक गोष्टीसाठी...
एका युझरने धोनीचा फोटो शेअर करताना म्हटले आहे, की एका युगाचा आज शेवट झाला.
विपुल सिंह यांनी लिहिले आहे. धोनी..., ज्याची एक शानदार स्टाईल होती. ज्याच्या नेतृत्वात भारताने 28 वर्षांनंतर विश्वचषक जिंकला, माही सर्व गोष्टींसाठी धन्यवाद
वाचा - MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीचे 'हे' दहा विक्रम मोडणे अशक्य!
वाचा - MS Dhoni Retirement: अशी कामगिरी करणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार