Join us  

काहींना कुंबळे करड्या शिस्तीचे वाटले, पण मला नाही

भारतीय कसोटी संघाचा यष्टिरक्षक रिद्धिमान साहाच्या काही सहका-यांना अनिल कुंबळे करड्या शिस्तीचे वाटले असतील, पण त्याला मात्र माजी प्रशिक्षक तसे भासले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:59 AM

Open in App

कोलकाता : भारतीय कसोटी संघाचा यष्टिरक्षक रिद्धिमान साहाच्या काही सहका-यांना अनिल कुंबळे करड्या शिस्तीचे वाटले असतील, पण त्याला मात्र माजी प्रशिक्षक तसे भासले नाही. कुंबळे यांनी कर्णधार विराट कोहलीसोबतच्या वादानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.कुंबळेला कोहलीसोबत मतभेद झाल्यानंतर यंदा जून महिन्यात राजीनामा देण्यास भाग पडले होते. माजी कर्णधार कुंबळे यांनी कोहलीसोबतच्या संबंधामध्ये स्थिरता नसल्याचे म्हटले होते. कुंबळेबाबत प्रतिक्रिया विचारली असता साहा म्हणाला,‘मला त्यांची पद्धत करडी वाटली नाही. प्रशिक्षक म्हणून त्यांना कुठे ना कुठे कडक धोरण राबविणे गरजेचे होते. कुणाला ते कडक वाटले तर कुणाला ते तसे भासले नाहीत. कुंबळेबाबत मला तसे वाटले नाही.’श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० ने विजय मिळवणाºया संघाचा सदस्य असलेला साहा आज मायदेशी परतला. त्यानंतर त्याने रवी शास्त्री व अनिल कुंबळे यांच्या प्रशिक्षण पद्धतीची तुलना केली.साहा म्हणाला,‘अनिल कुंबळे यांना नेहमी वाटायचे की आम्ही ४००, ५०० आणि ६०० अशी मोठी धावसंख्या उभारावी आणि प्रतिस्पर्धी संघाला १५० ते २०० धावांत गुंडाळावे. ते नेहमी शक्य नव्हते.’साहा पुढे म्हणाला,‘दुसºया बाजूचा विचार करता रवी शास्त्री आम्हाला नेहमी आक्रमक राहण्याचा सल्ला देतात. शास्त्री म्हणतात की, जा आणि प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवा. मला केवळ हाच एक फरक दिसतो. तसे दोघेही सकारात्मक बोलत होते. शास्त्री संचालक असताना आक्रमक होते. ते नव्या कार्यकाळात आमच्यासोबत अधिक मिसळले आहेत.’ श्रीलंकेविरुदच्या कसोटी मालिकेमध्ये साहाने लक्षवेधी यष्टीरक्षण केले होते. त्याच्या शानदार कामगिरीमुळे शास्त्री यांनी काहीदिवसांपुर्वीच साहाची तुलना महेंद्रसिंग धोनी व इंग्लंडचा माजी यष्टीरक्षक बॉब टेलर यांच्यासह केली होती. (वृत्तसंस्था)>कोहलीची प्रशंसाकर्णधार विराट कोहलीची प्रशंसा करताना साहा म्हणाला,‘विराट आपल्या सहकाºयांसोबत जुळवून घेतो. आम्ही एकत्र भोजन घेतो आणि एकत्र बाहेर फिरायला जातो. तो आमच्यासोबत नेहमी मिसळतो आणि ही त्याच्यात सकारात्मक बाब दिसून येते.’तसेच, कसोटी मालिकेमध्ये श्रीलंका संघाचे मनोधैर्य ढासळलेले होते. फलंदाजीमध्ये ते कमकुवत होते आणि त्याचा आम्हाला लाभ झाला, असेही साहाने यावेळी सांगितले.