भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना सध्या स्थगित करण्यात आला आहे. आता हा सामना पुढल्या वर्षी होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी मँचेस्टरमध्ये सुरु होणार असणारी ही मॅच टॉस उडवण्याच्या काही तासआधी रद्द करण्यात आली. भारतीय संघात वाढणाऱ्या कोरोना संक्रमितांमुळे खेळाडूमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. त्यानंतर दोन्ही क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
हा सामना रद्द झाल्यानंतर भारतीय टीमचा खेळाडू आणि इंग्लंडमध्ये कमेंटर म्हणून उपस्थित असणाऱ्या दिनेश कार्तिकनं(Dinesh Kartik) काही भारतीय खेळाडूंशी संवाद साधत संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. कार्तिकनं स्काई स्पोर्ट्सशी संवाद साधताना म्हटलं की, मी काही भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. जवळपास सगळे सामने झाले होते. ते थकलेले होते. त्यांच्याकडे केवळ एक फिजियो होता. याआधी त्यांच्याकडे दोन होते परंतु मुख्य कोचसह अनेक कोचिंग स्टाफ संक्रमित झाले होते. ज्याच्यानंतर टीमकडे केवळ एक फिजियो बाकी होता. त्यांनी खेळाडूंकडून खूप मेहनत करून घेतली परंतु आता तेही कोरोना पॉझिटिव्ह आहेत ही समस्या आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवी कसोटी रद्द; भारतीय संघात कोरोनाच्या शिरकावामुळे निर्णय
विशेष म्हणजे, चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय टीमचे मुख्य कोच नितीन पटेल कोरोना संक्रमित आढळले. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यानंतर पाचव्या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी टीमचे असिस्टेंट फिजियो योगेश परमार संक्रमित आढळले. योगेश अनेक खेळाडूंच्या संपर्कात होता त्यामुळे टीममधील काही खेळाडूंच्या मनात भीती निर्माण झाली. भारतीय खेळाडूंनी १६ मे रोजी देश सोडला होता त्याला ४ महिने होत आले. हा काळ खूप मोठा होता असंही दिनेश कार्तिकने सांगितले. त्यातच सर्व भारतीय खेळाडू सकाळी ३ वाजेपर्यंत झोपले नव्हते त्यामुळे कसोटी सामन्यात उतरणं जवळपास अशक्यच होतं असा खुलासाही कार्तिकने केला.
योगेश यांच्याआधी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. भारतीय संघाने कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन गुरुवारी सरावही रद्द केला होता. सर्व खेळाडू आपल्या खोल्यांमध्ये बंद होते. त्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. खेळाडू कोरोना निगेटिव्ह आलेले असले तरी कसोटी सामना खेळण्याबाबत साशंकता वर्तविण्यात येत होता. कारण या कसोटी मालिकेनंतर आयपीएल आणि पुढे टी-२० विश्वचषकाचं आयोजन आहे. त्यामुळे अशावेळी महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण होणं हे परवडणारं नाही. त्यामुळेच खबरदारी म्हणून पाचवी कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Fifth Test between England and India cancelled)
Web Title: Some Of Indian Players Didn't Sleep Till 3 Am Says Dinesh Karthik After Cancelled Manchester Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.