‘भारताच्या काही खेळाडूंना निर्बंध, शिस्त आवडत नाही’, मुंबई इंडियन्सच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाचा गौप्यस्फोट

स्टफ डॉट कॉम डॉट न्यूझीलंड या वेबसाइटशी संवाद साधताना ते म्हणाले,‘आम्हाला मात्र बबल सुरक्षित वाटत होते.’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 06:06 AM2021-05-12T06:06:06+5:302021-05-12T06:10:36+5:30

whatsapp join usJoin us
'Some Indian players don't like restrictions, discipline', Mumbai Indians fielding coach's secret blast | ‘भारताच्या काही खेळाडूंना निर्बंध, शिस्त आवडत नाही’, मुंबई इंडियन्सच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाचा गौप्यस्फोट

‘भारताच्या काही खेळाडूंना निर्बंध, शिस्त आवडत नाही’, मुंबई इंडियन्सच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाचा गौप्यस्फोट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आयपीएलचे १४ वे पर्व कोरोनामुळे मध्येच स्थगित झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स पेमेंट यांनी काही गोष्टींचा उलगडा केला. पेमेंट नुकतेच न्यूझीलंडला परतले. काही भारतीय खेळाडूंना बायोबबलमध्ये निर्बंध लादणे आवडत नसून ते शिस्तीचे काटेकोर पालन करण्यासही आडमुठेपणा दाखवितात, असा त्यांनी एका मुलाखतीत मंगळवारी गौप्यस्फोट केला.

स्टफ डॉट कॉम डॉट न्यूझीलंड या वेबसाइटशी संवाद साधताना ते म्हणाले,‘आम्हाला मात्र बबल सुरक्षित वाटत होते.’ आपल्या वक्तव्यादरम्यान पेमेंट यांनी एकाही भारतीय खेळाडूचे नाव मात्र घेतले नाही. ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री, जेम्स निशम आणि गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्ड यांच्यासमवेत पेमेंट ऑकलंडला परतले. “काही वरिष्ठ भारतीय खेळाडूंना बंदी किंवा त्यांना काही बोललेले आवडत नाही; पण आम्हाला तिथे सुरक्षित वाटले. बबलमध्ये काही झाले तर प्रवास करणे सर्वात मोठे आव्हान असेल”, अशी आधीपासूनच कल्पना होती, असे पेमेंट यांनी सांगितले.

ते म्हणाले,‘ भारतीय खेळाडूंचे कुटुंबीय आजारी होते; परंतु असे असूनही खेळाडूंनी उत्साह वाढविला आणि खेळतच राहिले. लीग थांबविण्याच्या दोन दिवस आधीपासूनच मुंबई संघातील खेळाडू साशंक होते. अन्य संघांत खेळाडू पॉझिटिव्ह आढळत असताना आम्हीही घाबरलो होतो. चेन्नई संघात काही खेळाडू पॉझिटिव्ह आले आणि आम्हाला नेमके चेन्नईत सामने खेळायचे होते. मी बराच वेळ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंसोबत घालविला. यादरम्यान आमच्याही खेळाडूंच्या मानत भीतीचे वातावरण असल्याची मला जाणीव झाली. मुंबई संघासाठी तयार करण्यात आलेल्या बबलमध्ये काही घडेल, असे मात्र मला वाटत नव्हते.’

‘आयपीएल आयोजन ६ शहरांत करणे हीदेखील चूक होती. सामने केवळ मुंबईत असते तरी शक्य झाले असते. मैदान कर्मचारी आणि स्टाफ यांचे व्यवस्थापन करण्यात कुठेतरी चूक झाली असावी. याशिवाय इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान ७० हजार प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देणे हादेखील बेजबाबदारपणा होता. अहमदाबाद येथे यामुळेच कोविड रुग्ण वाढले.’
- जेम्स पेमेंट 
 

Web Title: 'Some Indian players don't like restrictions, discipline', Mumbai Indians fielding coach's secret blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.