सिडनी : भारतीय संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री आठ महिन्याच्या ब्रेकनंतर बुधवारी मैदानावर परतले. आल्याआल्या त्यांनी सरावादरम्यान खेळाडूंमध्ये जोश भरला. पाऊल ठेवल्यानंतर आनंदी वाटते, असे सांगून कोरोनावर विजय मिळवून क्रिकेट सुरू झाल्यामुळे मोठे समाधान असल्याचे जाहीर केले.भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. नियमानुसार सर्व खेळाडू सध्या विलगीकरणात असून याच काळात सरावही सुरू आहे.आठ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची सर्वांना उत्सुकता आहे. फेब्रुवारीत न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळल्यानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा असेल. २७ नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वन डेद्वारे दौऱ्याची सुरुवात होणार आहे.
ईशांतने केली गोलंदाजीनवी दिल्ली : वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याने बुधवारी पूर्ण रनअपसह गोलंदाजीचा सराव केला. १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीआधी फिटनेस सिद्ध करण्याच्या निर्धाराने तो एनसीएत सरावात व्यस्त आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामन्यादरम्यान पोटाच्या डाव्या भागाच्या मांसपेशी ताणल्या गेल्याने तो जखमी झाला होता. यानंतर एनसीएत संचालक राहुल द्रविड आणि मुख्य फिजिओ आशिष कौशिक यांच्या मार्गदर्शनात ईशांत पुनर्वसन प्रशिक्षण घेत आहे. ३२ वर्षाच्या ईशांतने पूर्ण रनअपसह गोलंदाजी केली. यावेळी द्रविडसह मुख्य निवडकर्ते सुनील जोशी हे देखील उपस्थित होते. पारस म्हाम्ब्रे आणि मन्सूर खान या कोचिंग पथकाच्या देखरेखीत ईशांतने गोलंदाजी केली.
जबाबदारी स्वीकारल्याने आनंद झाला : शास्त्रीसंघाचे मुख्य कोच रवी शास्त्री हे संघासोबत पुन्हा जुळल्यानंतर खेळाडूंकडून कसून सराव करुन घेत आहेत. बुधवारी झालेल्या सराव सत्राचे फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केले. यावेळी अनेकांना घाम गाळेपर्यंत सराव करायला लावला. त्यांच्यासोबत हार्दिक पांड्या शार्दुल ठाकूर, आणि शिखर धवन फोटोमध्ये दिसतात. शास्त्री यांनी फोटोसोबत लिहिले,‘ आपल्या कामावर परतल्यामुळे आनंद होत आहे.’
कोहलीने सुरू केली कसोटीची तयारीn भारतीय कर्णधार विराट कोहली याने मंगळवारी ट्विटरवर सराव सत्राचा व्हिडिओ शेअर केला. कठोर सरावानंतर तो म्हणाला,‘मला कसोटी क्रिकेटचे सराव सत्र फार आवडते.याच व्हिडिओत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि फिरकीपटू रवींद्र जडेजा दिसत आहेत. कोहलीने लाल आणि गुलाबी चेंडूने फलंदाजीचा सराव केला, हे विशेष.
कसोटी मालिकेवर मुख्य फोकसn कसोटी मालिकेवर भारतीय संघ सर्वाधिक फोकस करणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली हा १७ डिसेंबरपासून ॲडिलेड येथे होणार्या पहिल्या कसोटीनंतर पहिल्या बाळाच्या जन्मामुळे मायदेशी परतणार आहे. दरम्यान कसोटी मालिकेत रोहित शर्माबाबत अद्याप तळ्यात मळ्यात सुरू आहे. जखमी असल्याने रोहितला वन डे मालिकेतून वगळण्यात आले होते. कसोटीत मात्र तो खेळेल का, याबद्दल शंका आहे. कसोटी संघात त्याची निवड झाली असली तरी त्याचे खेळणे फिटनेसवर विसंबून असेल.