वेगाचा बादशहा उसेन बोल्टला दु:खदायक निरोप

ज्या ट्रॅकवर गेली अनेक वर्षे अधिराज्य गाजवले, त्याच ट्रॅकवर दुर्दैवीपणे कोसळणाºया उसेन बोल्टसाठी त्याचा निरोप मात्र दु:खदायक राहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 04:29 AM2017-08-14T04:29:27+5:302017-08-14T10:15:52+5:30

whatsapp join usJoin us
As soon as the 'speed' stopped! | वेगाचा बादशहा उसेन बोल्टला दु:खदायक निरोप

वेगाचा बादशहा उसेन बोल्टला दु:खदायक निरोप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : ज्या ट्रॅकवर गेली अनेक वर्षे अधिराज्य गाजवले, त्याच ट्रॅकवर दुर्दैवीपणे कोसळणा-या उसेन बोल्टसाठी त्याचा निरोप मात्र दु:खदायक राहिला. उपस्थित चाहत्यांना जणू ‘वेग’ थांबल्याची अनुभूती आली. १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतील अशक्यप्राय असे विक्रम नोंदवणाºया बोल्टने आपल्या कारकिर्दीला विराम दिला. ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये तो सुवर्णपदकासाठी धावत होता. धावता धावता अचानक खाली कोसळला. हा क्षण सर्वांनाचा भावुक करणारा होता. बोल्टच्या कारकिर्दीचा असा शेवट होईल, असे कधीही वाटले नव्हते आणि म्हणूनच त्यालाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.
खाली पडला तेव्हा..
बोल्टला शेवटच्या लॅपमध्ये धावावे लागणार होते. जमैकाच्या तीन धावपटूंनी ३०० मीटर अंतर कापत आपले काम पूर्ण केले होते. मात्र, अंतिम लॅपमध्ये काही अंतर कापताच बोल्ट दुखापतग्रस्त झाला आणि खाली पडला. मांसपेशी ताणल्यामुळे बोल्टचे शेवटची शर्यत जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेचे सुवर्णपदक यजमान ग्रेट ब्रिटनच्या टीमने पटकाविले. अमेरिका संघाने रौप्य तर जपानच्या संघाने कांस्यपदक पटकाविले.
शर्यतीला झालेला उशीर महागात पडला : ब्लॅक
जमैकन धावपटूंच्या संघातील एक सदस्य असलेल्या योहान ब्लॅकने शर्यतीला झालेला उशीर आपणास महाग पडल्याची प्रतिक्रिया दिली. त्याने नाराजी व्यक्त करीत आयोजकांना लक्ष्य केले. बोल्टची दुखापतही यालाच कारणीभूत असून त्याच्या कारकिर्दीचा निराशाजनक शेवट झाल्याने आम्हाला दु:ख झाल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, की येथील वातावरण खूप थंड होते. अशातच शर्यतीसाठी वाट पाहावी लागली होती. शनिवारी होणारी अंतिम शर्यत ही पुरुषांची ५,००० मीटर आणि महिलांची उंच उडी या पदक समारोहानंतर सुरू झाली. वेळेवर सुरू झाली असती तर त्याचा फटका आम्हाला बसला नसता. आमच्यासोबत चांगली वागणूक झाली नाही, असा ठपका त्याने ठेवला आहे.
कांगने केले निराश; भालाफेकमध्ये
१२व्या स्थानावर
देविंदरसिंह कांग हा आपल्या ऐतिहासिक फायनल राउंडमध्ये प्रभावित करण्यात अपयशी ठरला. पुरुष भालाफेकमध्ये त्याने निराशाजनक कामगिरी करीत १२वे स्थान पटकाविले. विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारताची ही निराशाजनक कामगिरी राहिली. कांगने ७५.४० मीटर अशी सुरुवात केली आणि १३ खेळाडूंमध्ये आपल्या दुसºया प्रयत्नात फाउल केले. तीन राउंडनंतर तो बाहेर पडला. अव्वल आठ खेळाडूंनी स्पर्धेत आगेकूच केली. कांगचे सत्र आणि वैयक्तिक सर्वश्रेष्ठ प्रदर्शन ८४.५७ मीटर असे आहे. सत्रात अव्वल स्थानी राहणाºया जर्मनीच्या जोहानेस वेटरने ८९.८९ मीटर अशी कामगिरी करीत सुवर्णपदक पटकाविले.
दरम्यान, २८ वर्षीय कांग हा गांजाचा उपयोग केल्यामध्ये पॉझिटिव्ह आढळून आला होता. असे असतानाही त्याला भारतीय संघात स्थान मिळाले होते.

कारण यामुळे खेळाडू निलंबित होत नाही. त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत होती.
साथीदारही रडले...
बोल्ट खाली पडताच स्टेडियमवर सन्नाटा पसरला. उपस्थित चाहते अत्यंत भावुक होऊन एकमेकांकडे आश्चर्याने बघत होते. या शर्यतीनंतर बोल्टचे साथी खेळाडू अश्रूंना रोखू शकले नाहीत. बोल्टच्या साथीदारांचा पराभव आणि बोल्टच्या निवृत्तीचे दु:ख स्पष्ट दिसत होते.
ट्रॅकवर असा एकही विक्रम नसेल जो बोल्टने मोडला नसेल. सर्वच कीर्तिमान त्याने आपल्या नावे केले. कदाचित, त्याची जागा दुसºया खेळाडूला घेणे शक्यही नसेल. सलग तीन आॅलिम्पिकमध्ये तिन्ही प्रकारांत सुवर्णपदक पटकाविणारा हा ‘ब्लॅक गोल्ड’ माणूस अनेकांच्या स्मरणात राहील.
त्याने आठ वेळा आॅलिम्पिक सुवर्णपदक पटकाविले आहे. ११ जागतिक सुवर्णांचाही समावेश त्याच्या अलमारीत आहे. या महान खेळाडूला २००८, २००९, २०११, २०१२, २०१३ आणि २०१६ मध्ये ‘वर्ल्ड अ‍ॅथलिट आॅफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला आहे.

Web Title: As soon as the 'speed' stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.