भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड पक्की झाली. गांगुलीविरोधात अध्यक्षपदासाठी कोणीही अर्ज न भरल्यानं ही निवडणुक बिनविरोध झाली. नाट्यमय घडामोडीनंतर गांगुलीला हे अध्यक्षपद मिळाले आहे. गांगुलीच्या रुपानं 65 वर्षांनंतर भारतीय कर्णधार बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. अध्यक्षपदासाठीचा अर्ज भरण्यासाठी गांगुली सोमवारी बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात दाखल झाला. यावेळी निवड पक्की होताच गांगुलीनं आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर मुख्यालयातील एका फोटोसोबत त्यानं सेल्फी काढून जुन्या सहकाऱ्यांसोबत हा आनंद साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला. असा कोणता फोटो आहे की त्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह गांगुलीला आवरला नाही?
- Cricket Buzz»
- बातम्या»
- BCCIच्या मुख्यालयात सौरव गांगुलीला आवरला नाही 'त्या' फोटोसोबत सेल्फी घेण्याचा मोह!
BCCIच्या मुख्यालयात सौरव गांगुलीला आवरला नाही 'त्या' फोटोसोबत सेल्फी घेण्याचा मोह!
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड पक्की झाली.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 10:01 AM