मुंबई - आक्रमक नेतृत्वाने क्रिकेटच्या मैदानावर दादागिरी करणारा सौरव गांगुलीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राजीव शुक्ला यांनी ही घोषणा केली,
जगातील सर्वात शक्तिशाली आणि धनाढ्य क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआच्या अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन या दोन माजी गट आमने-सामने होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शह-काटशहाचे अनेक डाव रंगले. एका गटाने सौरव गांगुलीचे नाव पुढे केले होते. तर श्रीनिवासन यांच्या गटाने आपले वजन बृजेश पटेल यांच्या पारड्यात टाकले होते. या बैठकीत सीओए विरुद्ध देशातील सर्व क्रिकेट संघटना मिळून मोर्चेबांधणी करत होत्या. अखेर अध्यक्षपदासाठी झालेल्या खलबतांमध्ये गांगुलीचे पारडे जड ठरले.