Sourav Ganguly Attending Selection Meetings: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCIचा सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुली हा पुन्हा वादात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. विराट कोहलीसोबतचा वाद, निवड समितिच्या कार्यात ढवळाढवळ आदी आरोपांच्या चर्चा सुरू असताना Gangulyचा खोटारडेपणा उघड करणारे एक वृत्त पुन्हा समोर आले आहे. सौरव गांगुली टीम इंडियाच्या निवड प्रक्रियेत ढवळाढवळ करतो अशा बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. गांगुली निवड समितिच्या बैठकीत हजर असतो असेही त्यात म्हटले गेले होते, परंतु गांगुलीकडून अफवा असल्याच्या उत्तर आले होते. पण, आता BCCI च्या आणखी काही अधिकाऱ्यांनी गांगुलीचा खोटारडेपणा समोर आणला आहे.
Indian Express ने दिलेल्या वृत्तानुसार गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर २०१९पासून झालेल्या निवड समितीच्या प्रत्येक बैठकीत गांगुली हजर होता असा दावा माजी आणि आजी निवड समितीतल्या ३ सदस्यांनी केला आहे. गांगुली ऑनलाईनद्वारे निवड समितीच्या बैठकीला उपस्थित असायचा आणि त्याच्याकडे जे पद आहे त्यामुळे त्याला कोणीच काही बोलू शकत नव्हते, असा दावा एका निवड समितीतील एका सदस्याने केला. गांगुलीच्या उपस्थितीने समितीतील सदस्यांना अवघडल्यासारखे वाटायचे आणि ते त्यांची मत मोकळेपणाने मांडू शकत नव्हते.
याआधी InsideSports नेही वृत्त दिले होते. ''हे असंच घडतंय. तुम्ही तुमच्या बॉसकडे तक्रार करू शकता का?, तो निवड प्रक्रियेत हस्तक्षेप करायचा का? नाही. पण, त्याच्या उपस्थितीचे दडपण नेहमीच असायचे आणि त्यामुळे आपण जास्त काही बोलू शकत नाही,''असे एका सदस्याने Insidesportsला सांगितले होते.
सौरव गांगुली त्या आरोपांवर काय म्हणाला होता?
बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून माझी भूमिका काय, याची मला जाण आहे आणि हे सर्व आरोप निरर्थक आहेत, असे मत गांगुलीने व्यक्त केले. ''मी कोणाता उत्तर देण्यास बांधिल आहे असे मला वाटत नाही आणि या निराधार आरोपांचे मी खंडन करतो. मी बीसीसीआयचा अध्यक्ष आहे आणि अध्यक्ष म्हणून जे काम करायला हवं, ते मी करतो. त्या फोटोबाबत सांगायचे तर मी निवड समितीच्या बैठकीत दिसत असल्याचा दावा केला जात आहे. तर तो फोटो निवड समितीच्या बैठकीतला नाही. जयेश जॉर्ज हे निवड समितीच्या बैठकीचे सदस्य नाही. मी देशासाठी ४२४ आंतरराष्ट्रीय सामने खेळलो आहे. काही लोकांना याची आठवण करुन देणे ही कल्पना वाईट नाही.''
Web Title: Sourav Ganguly Attending Selection Meetings: 3 more Selectors voice concerns on BCCI President attending selection meetings, Report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.