Big controversy related to Sourav Ganguly : विराट कोहलीसोबतचा कथित वाद ताजा असताना भारताचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणखी एका वादात अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. निवड समितीच्या काही बैठकीत गांगुलीने सक्तीने हजेरी लावली, असा ट्विट व्हायरल झाले आणि त्यावरून वाद सुरू झाला आहे. या प्रकरणी काही इंग्रजी वेबसाईटने गांगुली व बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून काहीच रिप्लाय मिळाला नाही. बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांनी ही दुर्दैवी घटना असल्याचे मत व्यक्त केले.
''ही वायफळ चर्चा आहे आणि अफवा आहेत,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं Inside.sport ला सांगितले. दुसऱ्या अधिकाऱ्यानं सांगितले की,''अनेकदा गांगुली सक्तीनं बैठकीला उपस्थित राहीला आहे. बीसीसीआयचा कारभार सध्या असाच सुरू आहे. निवड समितीच्या बैठकीत गांगुलीचं काहीच काम नसतं. पण हे दुर्दैवी आहे.''
नेमकं प्रकरण काय?
एका वरिष्ठ पत्रकाराच्या ट्विटवरून हा वाद सुरू झाला. त्यांनी बीसीसीआय अधिकारी निवड समितीच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचे ट्विट केले. त्यात त्यांनी असेही म्हटले की निवड समिती सदस्यांनी स्वतः बीसीसीआय अधिकाऱ्यांना निमंत्रित केले. त्यांच काहीच काम नाही, हे माहीत असूनही त्यांनी असे केले.
काहींनी गांगुली व जय शाह यांनी निवड समितीच्या बैठकीला उपस्थिती लावल्याचे फोटो पोस्ट केले.
Web Title: Sourav Ganguly Attending Selection Meetings? BCCI house divided on allegations on board President, cricket fans says ‘Sourav Ganguly complete disgrace’
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.