Sourav Ganguly BCCI President: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) सध्या या पदावर आहे. मात्र आता त्याचा कार्यकाळ वाढवला जाणार नसल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. गांगुलीला पदावरून हटवले जाऊ शकते आणि त्याच्या जागी 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघातील रॉजर बिन्नी यांची नियुक्ती होऊ शकते.
गांगुलीने तोडले मौनया सर्व बातम्यांवर आता स्वतः गांगुलीने मौन तोडले आहे. एका खासगी बँकेच्या कार्यक्रमात तो म्हणाला की, 'आयुष्य असेच असते. आयुष्यात चढ-उतार येत राहतात. अशा परिस्थितीत स्वत:वर विश्वास ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. लॉर्ड्सवर पदार्पणाच्या वेळी माझी मानसिकता सर्वोत्तम होती. मी तिथे माझ्या पद्धतीने खेळलो. मोठे होण्यासाठी छोटी पावले उचलावी लागतात.'
गांगुली अन्य क्षेत्रात हात आजमावणार गांगुली पुढे म्हणाला की, 'मी एक प्रशासक राहिलो आहे. हे पद गेल्यावर, दुसरं काहीतरी करेन. आयुष्यात स्वतःवर विश्वास असायला हवा. आयुष्य परीक्षा घेते, त्यात यश-अपयश मिळते. पण, उरतो तो स्वतःवरचा विश्वास. आयुष्यात सर्वकाही पटकन मिळत नाही. तुम्ही एका दिवसात सचिन तेंडुलकर किंवा नरेंद्र मोदी बनत नाही,' असंही गांगुली म्हणाला.
जय शाह सचिवपदी कायम BCCIची गणना जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डांमध्ये केली जाते. सौरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मुदतवाढ मिळू शकते किंवा आयसीसी अध्यक्षपदासाठी नामांकन मिळू शकते, असे मानले जात होते. मात्र, त्यावर अद्याप कोणतेही नवीन अपडेट आलेले नाही.सौरव गांगुलीने 2019 मध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. तेव्हापासून जय शहा सचिवपदी आहेत. दोघांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत आहे. मात्र जय शाह आपल्या पदावर कायम राहतील, तर गांगुलीच्या जागी रॉर्जर बिन्नी येणार आहेत.