नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर टीम इंडियावर टीका होत आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री आणि फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यातच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर टीका केली आहे.भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने म्हटले की, ‘आता जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आहे. भारतीय संघाच्या पराभवाविषयी रवी शास्त्री आणि संजय बांगर यांनादेखील प्रश्न विचारले पाहिजे. फलंदाज का अपयशी ठरले याचे कारण संजय बांगर यांनी द्यावे, तसेच रवी शास्त्री हेदेखील तेवढेच जबाबदार आहे. २०११ नंतर भारताचा परदेशातील हा सर्वात मोठा मालिका पराभव आहे. याचे मुख्य कारण म्हणजे खराब फलंदाजी.’गांगुली पुढे म्हणाला की, ‘भारतीय फलंदाजांमध्ये आत्मविश्वास कमी दिसला. रहाणे असो वा पुजारा, सर्वच फलंदाज दबावात खेळत होते. हे लवकरात लवकर दूर करावे लागेल. त्यामुळेच शास्त्री व बांगर यांना फलंदाजांच्या अपयशासाठी जबाबदार ठरवावे लागेल. संपूर्ण मालिकेतकेवळ एकच फलंदाज फॉर्ममध्ये दिसला, तर इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले.’ (वृत्तसंस्था)जोपर्यंत भारताच्या पराभवाचे समाधानकारक उत्तर मिळणार नाही, तोपर्यंत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि आॅस्टेÑलिया या देशांमध्ये भारतीय संघाचा विजय साकार होणार नाही,’ असेही माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- सौरव गांगुलीने साधला प्रशिक्षक रवी शास्त्रींवर निशाणा
सौरव गांगुलीने साधला प्रशिक्षक रवी शास्त्रींवर निशाणा
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर टीम इंडियावर टीका होत आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री आणि फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 1:16 AM