IPL 2020 ही जगातील सर्वोत्तम स्पर्धा; सौरव गांगुलीनं केलं कौतुक

Indian Premier League ( IPL 2020) अंतिम टप्प्यात आलेली आहे. प्ले ऑफचे चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

By स्वदेश घाणेकर | Published: October 28, 2020 03:44 PM2020-10-28T15:44:39+5:302020-10-28T15:45:15+5:30

whatsapp join usJoin us
Sourav Ganguly calls IPL as ‘the best tournament in the world’ | IPL 2020 ही जगातील सर्वोत्तम स्पर्धा; सौरव गांगुलीनं केलं कौतुक

IPL 2020 ही जगातील सर्वोत्तम स्पर्धा; सौरव गांगुलीनं केलं कौतुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) अंतिम टप्प्यात आलेली आहे. प्ले ऑफचे चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) संघानं सलग पाच सामने जिंकून केलेलं कमबॅक सर्वांना आश्चर्यचकीत करणारं आहे, तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) आलेख घसरत चालला आहे. त्यामुळे प्ले ऑफची चुरस आणखी वाढत चालली आहे. त्यात BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यानं आयपीएल ही जगातील सर्वोत्तम स्पर्धा असल्याचे मत मांडले आहे. कोरोना व्हायरलच्या संकटात आयपीएल २०२० होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण, बीसीसीआयनं UAEत स्पर्धा खेळवली आणि त्याला मिळत असलेला प्रतिसाद पाहून गांगुलीनं आनंद व्यक्त केला.

आयपीएलच्या पहिल्या सामन्यानं व्ह्यूअर्सशिपचे सर्व रेकॉर्ड मोडले. मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्यातल्या सलामीचा सामना २० कोटी लोकांनी पाहिला.''अविश्वसनीय आणि मला त्याचं आश्चर्य वाटत नाही.  ही स्पर्धा यूएईत घेण्यासाठी आम्ही जेव्हा स्टार आणि अन्य लोकांशी चर्चा केली.  सर्व गोष्टींवर चर्चा केल्यानंतर स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेतला. आम्हाला क्रिकेटला सुरुवात करायची होती आणि आम्हाला मिळालेल्या प्रतिसादाने मला आश्चर्च वाटत नाही,''असे गांगुली म्हणाला.

आयपीएल ही जगातील सर्वोत्तम स्पर्धा असल्याचे सांगताना गांगुली म्हणाला,''आतापर्यंत अनेक सुपर ओव्हर झाल्या. एकाच सामन्यात डबल सुपर ओव्हर सर्वांनी अनुभवली. शिखर धवनचे सलग दोन शतकं, रोहित शर्माची फटकेबाजी, युवा खेळाडूंचा आक्रमक खेळ आणि लोकेश राहुलच्या किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे कमबॅक हे सर्व आपण पाहिले. तुम्हाला इथे सर्व काही मिळाले. मी पैज लावतो की, यंदा आयपीएल सर्व रेकॉर्ड मोडेल.''
 

Web Title: Sourav Ganguly calls IPL as ‘the best tournament in the world’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.