IPL 2022 Venue : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी १२ व १३ फेब्रुवारीला मेगा ऑक्शन बंगळुरू येथे पार पडणार आहे. पण, या ऑक्शनआधी बीसीसीआयनं स्पर्धा नेमकी कुठे खेळवली जाईल, याची घोषणा करावी, अशी मागणी सर्व फ्रँचायाझींनी केली होती. भारतातील कोरोना परिस्थिती सध्या आटोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्र। तामिळनाडू, केरळ आदी राज्यांत कोरोनाचे अधिक रुग्ण आहेत. असे असले तरी आयपीएल २०२२ ही भारतातच होईल, अशी घोषणा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) ने केली आहे.
स्पोर्ट्स्टारसोबत बोलताना गांगुलीने या वृत्ताला दुजोरा दिला. गांगुलीच्या माहितीनुसार आयपीएलचे साखळी सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे खेळवण्याचा विचार सुरू आहे, तर प्ले ऑफचे सामन्यांचा निर्णय नंतर घेतला जाईल, असे गांगुलीने सांगितले. प्ले ऑफचे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयपीएल प्ले ऑफसोबत महिलांची आयपीएल स्पर्धाही यंदा खेळवण्यात येईल असेही गांगुलीने स्पष्ट केले.
असे असतील नवे नियम ( IPL 2022 New Rules and Format)
- २०११मध्ये १० संघ खेळले होते आणि तोच फॉरमॅट २०२२मध्येही असेल.
- दहा संघांनी दोन प्रत्येकी पाच-पाच अशा दोन गटांत विभागणी करण्यात येईल
- गटातील प्रत्येक संघ एकमेकांशी दोन आणि दुसऱ्या गटातील संघाशी एक असे सामने खेळतील
- साखळी फेरीत प्रत्येक संघ १४ सामने खेळतील. विजयी संघाला दोन गुण मिळतील, तर सामना अनिर्णीत राहिल्या दोन्ही संघांना प्रत्येकी १-१गुण दिला जाईल.
- प्ले ऑफचे चार सामने
- क्वालिफायर १ - साखळी फेरीत पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये
- एलिमिनेटर - तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये
- क्लालिफायर २ - क्वालिफायर १मधील पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटर मधील विजयी संघ
- अंतिम सामना - क्वालिफायर १ विरुद्ध क्वालिफायर २