कोरोनाची दुसरी लाट भारतात आली असतानाही इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) आयोजनावरून टीका होत आहे. मागच्या वर्षी कोरोना व्हायरसमुळेच ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत ( UAE) येथे आयोजित करण्यात आली होती. यंदाही आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिसनं UAEचा पर्याय BCCIसमोर ठेवला होता, परंतु त्याला केराची टोपली दाखवताना भारतात स्पर्धा आयोजित केली. आता २९ सामन्यानंतर कोरोनानं आयपीएलसाठी तयार केलेला बायो बबल फोडला अन् खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर बीसीसीआयला स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. यानंतरही बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यानं भारतात आयपीएल खेळवण्याचा निर्णयाचं समर्थन केलं. विराट कोहली कोरोनाविरुद्धच्या लढ्यात युवा सेनेसह उतरला मैदानावर; IPL 2021 स्थगितीनंतर लागला कामाला
कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्थी व संदीप वॉरियर्स, सनरायझर्स हैदराबादचा वृद्धीमान सहा, दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि चेन्नई सुपर किंग्सचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी व गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी यांच्यासह दोन सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर बीसीसीआयनं तातडीची बैठक घेऊन स्पर्धा स्थगितीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर भारतात आयपीएल आयोजनाचा निर्णय चुकला का, असा सवाल सौरव गांगुलीला करण्यात आला. तो म्हणाला,'' नाही. आम्ही जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा कोरोना रुग्णांचा आकडा एवढा नव्हता. इंग्लंड मालिकेचे यशस्वी आयोजन आम्ही केलेच होते. UAEच्या पर्यायावर चर्चा केली गेली, परंतु फेब्रुवारीत देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होती.'' मानलं MS Dhoni ला; संघातील प्रत्येक खेळाडू रवाना झाल्यानंतरच रांचीला जाणार कॅप्टन कूल आयपीएल स्थगितीनंतर बीसीसीआयसमोर नवं आव्हान
आयपीएल स्थगित करण्याच्या निर्णयानंतर सर्व खेळाडूंना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवण्याचं आव्हान बीसीसीआयसमोर आहे. देशातील कोरोना रुग्णांची वाढलेल्या संख्येमुळे अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या विमानसेवा रद्द केल्या आहेत. त्यामुळे परदेशी खेळाडूंना मायदेशात पाठवण्याची सोय करण्यासाठी आयपीएलचे लॉजिस्टीक मॅनेजर आणि प्रत्येक फ्रँचायझींचे CEO अहोरात्र मेहनत घेत आहेत. ''मंगळवार दुपारपासून आम्ही खेळाडूंच्या घरवापसीसाठी काम करत आहोत, आणि त्या दृष्टीनं आखणी करतोय, परंतु प्रत्येक अर्ध्यातासानं त्यात बदल करावा लागत आहे,''असे पंजाब किंग्सच्या अधिकाऱ्यानं सांगितले. मुंबई इंडियन्सचा नाद खुळा; स्वतःच्या चार्टर्ड फ्लाईट्सनं खेळाडूंना पाठवणार मायदेशी, अन्य फ्रँचायझींनाही मदतीची तयारी!