कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. भारतातही 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. चित्रपट सृष्टीतही अशी अनेक लोकं आहेत की ज्यांच्यावर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मदतीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यानं पुढाकार घेतला आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात गांगुलीनं पुढाकार घेऊन अनेकांना मदत केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात गांगुलीनं 50 लाख रुपये किमतीचे तांदूळ दान केले. शिवाय त्यानं 10,000 लोकांच्या जेवणासाठीही आर्थिक मदत केली. गांगुलीनं पश्चिम बंगाल सरकारलाही त्याच्या परीनं मदत केली होती. लॉकडाऊनच्या संकटात इस्कॉनलसोबत त्यानं दररोज 20 हजार लोकांच्या जेवणची सोय केली होती. गांगुलीनं केंद्र सरकारला 50 लाख देण्याचा निर्णय घेतला होता.आता त्यानं Tollygunge Artists’ Forum ला दहा लाखांची मदत केली आहे. याआधी गांगुलीनं अम्फान वादळामुळे नुकसान झालेल्या 10 हजार कुटुंबीयांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरला होता.
दरम्यान, गांगुलीच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर येत आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव स्नेहशीष गांगुली यांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली. स्नेहशीष हे सौरव गांगुलीचे मोठे बंधू आहेत. स्नेहशीष यांची पत्नी, सासू आणि सासरे यांना कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे. स्नेहशीष यांच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीलाही कोरोना झाल्याचे नुकतेच समोर आले होते.
जगभरातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत जगभरात 87 लाख 66,035 कोरोना रुग्ण आढळले असून 46 लाख 27,883 रुग्ण बरे झाले आहेत. पण, दुर्दैवानं 4 लाख 62,691 रुग्णांना जीव गमवावा लागला. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 96,182 इतकी झाली असून 2 लाख 14,209 रुग्ण बरे झाले आहेत. 12970रुग्णांचे निधन झाले आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Shocking : सौरव गांगुलीच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण
बीसीसीआयवर वाढता दबाव; चिनी कंपनींसोबतचे करार संपुष्टात आणा, अन्यथा...
माजी क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह; मुंबई इंडियन्ससोबत केलं होतं काम
बाबो; 20 सेकंदाचा 'सोपा' व्यायाम जमतो का बघा; हरभजन सिंगनं शेअर केलेला Video Viral
चिनी स्पॉन्सर्सबाबत IPL गव्हर्निंग काऊंसिल मोठा निर्णय घेणार? बोलावली तातडीची बैठक
युजवेंद्र चहल अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही; पोस्ट केला वेदनादायक फोटो
गरजूंच्या मदतीसाठी निम्मं वेतन दान करणाऱ्या क्रिकेटपटूला झाला कोरोना!
Web Title: Sourav Ganguly donates Rs 10 lakh to Tollygunge Artists’ Forum to help cine workers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.