सौरव गांगुलीने दिले विराटसेनेना पुढच्या वर्षीसाठी 'हे' चॅलेंज

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारताच्या संघाला पुढच्या वर्षासाठी एक चॅलेंज दिले आहे. आता भारतीय संघ हे चॅलेंज पूर्ण करतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 07:25 PM2019-12-29T19:25:54+5:302019-12-29T19:26:46+5:30

whatsapp join usJoin us
Sourav Ganguly gives 'This' Challenge to Indian cricket team for next year | सौरव गांगुलीने दिले विराटसेनेना पुढच्या वर्षीसाठी 'हे' चॅलेंज

सौरव गांगुलीने दिले विराटसेनेना पुढच्या वर्षीसाठी 'हे' चॅलेंज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारतीय संघ जानेवारी महिन्यात १० सामने खेळणार आहे.

मुंबई : भारतीय संघातील खेळाडू सध्या विश्रांती घेत आहेत. कारण सध्याच्या घडीला भारताचा एकही सामना नाही. पण पुढचे वर्ष भारतासाठी महत्वाचे ठरणार आहे. भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारताच्या संघाला पुढच्या वर्षासाठी एक चॅलेंज दिले आहे. आता भारतीय संघ हे चॅलेंज पूर्ण करतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Image result for ganguly with virat kohli

भारतीय संघ जानेवारी महिन्यात १० सामने खेळणार आहे. यामध्ये सात ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. पहिल्यांदा भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. त्यानंतर भारत आणि  ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये मायदेशात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. यानंतर भारताचा संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात जानेवारी महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये चार ट्वेन्टी-२० सामने खेळवले जाणार आहे.

Image result for ganguly with virat kohli

पुढच्या वर्षी सर्वांचे लक्ष असेल ते ट्वेन्टी-२० विश्वचषकावर. ऑस्ट्रेलियामध्ये नऊ महिन्यांनंतर विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिलेले आहे. भारताने या विश्वचषकासाठी संघ बांधणी सुरु केली आहे.

Image result for ganguly with virat kohli

गांगुली यांनी भारतीय संघाला यावेळी एक चॅलेंज दिले आहे. भारताचा संघ २०१८ साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात भारताने दमदार कामिगिरी केली होती. आगामी वर्षातही भारताला ऑस्ट्रेलियामध्ये खेळायचे आहे.

Image result for ganguly with virat kohli

गांगुली म्हणाले की, " भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या २०१८ साली झालेल्या दौऱ्यात विजय मिळवला होता. पण यावेळी त्यावेळेच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा संघ तगडा आहे. त्यामुळे यावेळी भारताला ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मातीत पराभूत करणे सोपे नाही. माझ्यामते ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत नमवणे हे भारतासाठी मोठे चॅलेंज असेल." 

Web Title: Sourav Ganguly gives 'This' Challenge to Indian cricket team for next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.