Join us  

शुबमन, कॅमेरूनचं कौतुक, पण एक नाव विसरला? Sourav Gaungulyच्या दुटप्पीपणावर संताप

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये RCBचा माजी कर्णधार विराट कोहली याने दिल्ली कॅपिटल्सचा मार्गदर्शक सौरव गांगुलीशी पंगा घेतलेला सर्वांनी पाहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 5:26 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये RCBचा माजी कर्णधार विराट कोहली याने दिल्ली कॅपिटल्सचा मार्गदर्शक सौरव गांगुली आणि लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्याशी पंगा घेतलेला सर्वांनी पाहिला. पण, १५ दिवसांपूर्वी गांगुली आणि विराट यांनी DC vs RCB यांच्या लढतीनंतर एकमेकांना हातमिळवल्याने वाद इथेच मिटल्याची चर्चा होती. पण, भारताचा माजी कर्णधाराच्या एका ट्विटने नेटिझन्स पुन्हा खवळले आहेत आणि त्यांनी दादाचा क्लास घेतला. आयपीएल २०२३ च्या साखळी फेरीतील अखेरच्या दोन सामन्यांत तीन शतकं झळकली. कॅमेरून ग्रीन ( मुंबई इंडियन्स,) विराट कोहली ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) आणि शुबमन गिल ( गुजरात टायटन्स) यांनी शतक झळकावले. पण, सौरव गांगुलीने यापैकी फक्त दोघांचे कौतुक केले अन् वादाला तोंड फुटले.  

''या देशामध्ये टॅलेंट्सची कमी नाही, शुबमन गिल, Wow. आयपीएलमध्ये पाठोपाठ दोन शतकं... हा या स्पर्धेचा दर्जा आहे,''असे ट्विट गांगुलीने केले. गांगुलीच्या या ट्विटने ग्रीन व शुबमन गिल यांच्या शतकाचे कौतुक झाल्याचा अंदाज नेटिझन्सनी बांधला अन् विराट कोहलीचं नाव नसल्याने संताप झाला.   

गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष असताना कोहलीला भारताच्या वन डे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि RCB च्या कोहलीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यानंतर गांगुलीकडे दुर्लक्ष केल्यावर हा वाद आणखी चिघळला. पण, परतीच्या सामन्यात दोघांनीही एकमेकांना हात मिळवलेला पाहिला गेला.   आयपीएल २०२३ मध्ये विराटने १४ सामन्यांत दोन शतकं व सहा अर्धशतकांसह ६३९ धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील हे त्याचे ८वे शतक ठरले अन् त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक ७ शतकांचा विक्रम करताना ख्रिस गेलचा ( ६) विक्रम मोडला. आयपीएलमध्ये सर्वाधिक ७२६३ धावांचा विक्रम विराटच्या नावावर आहे आणि एका फ्रँचायझीकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही तोच आहे. त्याने कर्णधार म्हणूनही RCBकडून ५००० धावा पूर्ण केल्या आहेत आणि रोहित शर्मालाच असा पराक्रम करता आलाय.

टॅग्स :आयपीएल २०२३सौरभ गांगुलीविराट कोहली
Open in App