ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर कोण विराजमान होणार, याची चर्चा आतापासूनच सुरू आहे. यात सर्वात आघाडीवर नाव आहे ते, टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड ( Rahul Dravid)... पण, राहुल द्रविडनं बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या ( NCA) अध्यक्षपदावर कायम राहून युवा खेळाडूंनाच मार्गदर्शन करण्यात समाधान असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याच्या नव्या विधानानं पुन्हा एकदा द्रविड मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत आला आहे आणि दी वॉलचे चाहते आनंदीत झाले आहेत.
रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावर तात्पुरत्या स्वरूपात विराजमान होऊ शकतो, असे मत सौरव गांगुलीनं अप्रत्यक्षीतरित्या मांडलं. Sourav Ganguly has hinted that Rahul Dravid can be Team India’s temporary coach once Ravi Shastri steps down. तो म्हणाला,''राहुल द्रविड याला मुख्य प्रशिक्षकपदावर कायमस्वरूपी राहण्यात याची मला कल्पना आहे, परंतु त्यालाही आम्ही त्याबाबत अद्याप विचारलेले नाही. जेव्हा तशी वेळ येईल, तेव्हा त्याबाबत चर्चा करू.''
बीसीसीआयनं नुकताच श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंचा संघ पाठवला होता आणि त्याचे प्रशिक्षकपद राहुल द्रविडकडे सोपवले होते. भारतानं वन डे मालिका जिंकली, परंतु ट्वेंटी-२० त हार मानावी लागली. ट्वेंटी-२० मालिकेदरम्यान टीम इंडियाच्या १० खेळाडूंना क्वारंटाईन व्हावं लागलं आणि त्यामुळे राखीव व युवा खेळाडूंसह संघ मैदानावर उतरला होता. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रविड या भूमिकेत दिसेल, अशी चर्चा आता पुन्हा रंगत आले.
रवी शास्त्री यांचाच भीडू होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक?
भारतीय संघाचे सध्याचे फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांचे नाव पुढील मुख्य प्रशिक्षक म्हणून समोर येत आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी राठोड हे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले आहे. राठोड हे अनेक वर्षांपासून रवी शास्त्री यांच्यासोबत काम करत आहेत. राठोड यांचे कर्णधार विराट कोहली याच्यासोबतही चांगले जुळते. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे. राठोड यांच्या कार्यकाळात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. रिषभ पंत, विराट व रोहित शर्मा यांची फलंदाजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक बहरली आहे.