देशातील कोरोना संक्रमित लोकांची संख्या रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन मंगळवारी जाहीर केला. कोरोना व्हायरसमुळे देशातील सर्व प्रमुख स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशातील क्रिकेट स्पर्धा रद्दच झाल्या आहेत. अशात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीनं कोतकाता सरकारला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानं क्वारंटाईन सुविधांसाठी राज्य सरकारसाठी ऐतिहासिक इडन गार्डन मैदान खुलं करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
सोशल डिस्टन, सेल्फ आयसोलेशन, क्वारंटाईन ही पर्यायं जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी वापरण्यात आली आहेत. भारतातही पुढील 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण, अजूनही क्वारंटाईन सुविधांची उणीव जाणवत आहे. क्वारंटाईन लोकांना इतरांपासून दूर ठेवणं हे महत्त्वाचे पाऊल आहे. त्यासाठी आता गांगुली पुढे आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गांगुली म्हणाला,''राज्य सरकारने आम्हाला विचारणा केल्यास आम्ही इडन गार्डनवरील सुविधा त्यांना पुरवण्यास तयार आहोत. आम्हाला त्या घडीला जे करता येईल ते आम्ही करू. आमची काहीच हरकत नाही.''
बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर गांगुलीनं अनेक महत्त्वाची पावलं उचलली आहेत. गांगुलीच्या मार्गदर्शनाखाली भारतानं पहिला डे नाईट कसोटी सामना खेळला. आता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) रद्द करणे हा महत्त्वाचा निर्णय गांगुलीला घ्यावा लागणार आहे.
आतापर्यंत जगभरात 4, 22,829 कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि त्यापैकी 18, 907 जणांचा मृत्यू झाला आहे. पण, एक लाखाहून अधिक लोकंही बरी झाली आहेत. भारतातील आकडा 562 झाला असून त्यापैकी 11 जणं दगावली आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लिओनेल मेस्सी अन् ख्रिस्तियानो रोनाल्डो यांंचा मदतीचा हात; सार्वजनिक हॉस्पिटलला कोट्यवधींची मदत
सानिया मिर्झाची समाजोपयोगी चळवळ; रोजंदारी कामगारांचे पोट भरण्याचा निर्धार
संपूर्ण देश लॉकडाऊन; आर अश्विननं जनतेला करून दिली 'त्या' प्रसंगाची आठवण
Video : शिखर धवन बनला धोबी... सायना नेहवालसह डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबीकडून सांत्वन
पंतप्रधान मोदींच्या 'त्या' घोषणेनं IPL 2020च्या आशा मावळल्या? BCCIचं महत्त्वपूर्ण विधान
Read in English
Web Title: Sourav Ganguly offers Eden Gardens to government as quarantine facility to battle coronavirus svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.