भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुलीनं त्याच्या पसंतीचा IPL संघ निवडला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्यानं माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पसंती न देता त्याच्या संघात युवा यष्टिरक्षक रिषभ पंतला संधी दिली आहे. इंडियन प्रीमिअर लीमगध्ये धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं तीन जेतेपद नावावर केली आहेत आणि लीगमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्याची ओळख आहे. असे असतानाही गांगुलीनं त्याला न घेतल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. वन डे वर्ल्ड कपनंतर धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे रिषभ पंतला खेळण्याची संधी मिळाली आहे. पण, त्याला त्याचा फार फायदा करून घेता आलेला नाही. त्यामुळे निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी रिषभला ताकीद दिल्याचे समजते. असे असतानाही गांगुलीनं रिषभची केलेली निवड ही सर्वांना बुचकळ्यात टाकणारी आहे. रिषभच्या निवडीबद्दल गांगुली म्हणाला,''पंत हा युवा यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यामुळे मला यावर कोणतीही चर्चा करायची नाही.''
सौरव गांगुलीचा IPL संघ सौरव गांगुली ( कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, रिषभ पंत ( यष्टिरक्षक), मार्कस स्टोयनिस, रवींद्र जडेजा, आंद्रे रसेल, रियान पराग, जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर