भारतीय नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीनं टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजालारणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची परवानगी नाकारली आहे. सौराष्ट्र विरुद्ध बंगाल असा रणजी करंडक 2019-20 चा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात जडेजाला खेळण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला होती. मात्र, गांगुलीनं ती नाकारली आहे. काय आहे त्यामागचं कारण?
रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामना 9 ते 13 मार्च या कालावधीत राजकोट येथे होणार आहे. याच कालावधीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना 12 मार्चला धरमशाला येथे होईल. जडेजा हा तीनही फॉरमॅटमधील भारतीय संघाचा सदस्य आहे आणि आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याची निवड होईल, असे अपेक्षित आहे.
हा मुद्दा लक्षात असूनही सौराष्ट्रचा माजी कर्णधार आणि सध्याच्या अध्यक्ष जयदेव शाह यांनी गांगुलीकडे अंतिम सामन्यात जडेजाला खेळण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. शाह म्हणाले, ''मी या संदर्भात गांगुलीशी चर्चा केली. रणजी खेळण्यासाठी राष्ट्रीय संघाला दुसरे स्थान देण्याची बीसीसीआय परवानगी देत नाही. राष्ट्रीय संघाला प्रथम प्राधान्य,असे गांगुलीनं मला सांगितले.''
चेतेश्वर पुजारा ( सौराष्ट्र) आणि वृद्धीमान सहा ( बंगाल) यांना रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची परवानी मिळाली आहे. हे दोन्ही खेळाडू भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचे सदस्य नाहीत. मोहम्मद शमीही बंगालकडून खेळण्याची आशा होती, परंतु ते शक्य नाही. कारण, तो वन डे संघाचा सदस्य आहे.
विंडीजचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार Daren Sammyकडे पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षकपद
IPL 2020च्या बक्षीस रकमेतील कपात ही कॉस्ट-कटिंग नाही; BCCIनं सांगितलं खरं कारण!